पान:पाकिस्तानचे संकट.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तान : शब्द व कल्पना उद्योग पुढे अव्याहत चालला नाही याचे एक कारण असे दिसते की, परधर्मस्वीकारामुळे ही भारती संतति* पुढेमागें भारतमातेच्या शरीराचेच तुकडे करण्याला प्रवृत्त होईल ही अमानुष कल्पना त्या काळांतल्या सत्ताधारी हिंदूंच्या मनाला शिवलीच नसावी. पण आज ती कल्पना दररोज बोलली जाऊ लागली आहे. "कारटी, करंटी जिथे मातृशोणितें । स्वताला लाली, आणाया धावली" हे विनायक कवींचे उद्गार वेगळ्या निमित्ताने काढलेले आहेत. भारती संतति म्हणून आपण आजवर ज्यांच्याकडे आपलेपणाने पाहात आलों त्यांच्या बाबतींत असे उद्गार काढण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवेल अशी कल्पनाहि आजवर कोणाला नव्हती. पाकिस्तान ही भेसूर कल्पना भारतीय हिंदूंप्रमाणेच ख्रिश्चन, पार्शी, ज्यू वगैरे अन्य समाजांपुढेहि आज भुतासारखी नाचू लागली आहे. त्यामुळे भारती संतति म्हणून स्वतःचा मोठ्या गौरवार्ने उल्लेख करणाऱ्या या सर्वांनाच आज गंभीरपणाने एकत्र विचार करण्याचा प्रसंग आला आहे. भारतमातेच्या शरीराचा तुकडा वेगळा तोडून मागणाऱ्या व तेथें आपलें अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या लोकांच्या वृत्तीचा या सगळ्यांनी नीट तपास केला पाहिजे. ही मागणी अनैतिहासिक व अस्वाभाविक आहे हे या सर्वांनी पाकिस्तानवाल्यांना–व कोणी त्यांचा पाठीराखेपणा करतील तर त्यांना-बजावून सांगितले पाहिजे; कारण, त्यांना समजावून सांगण्याची ष समजावून देण्याची वेळ केव्हांच निघून गेली आहे !

  • आपण भारतभूचे पुत्र आहोत ही कल्पना भारतमातेचे विच्छेदन करूं पाहणाऱ्या मुसलमानांच्या मनांतहि अद्याप कशी रेंगाळत आहे हे पाहण्यासारखें आहे ! अलीगडच्या दोन प्रोफेसरांनी भारतविच्छेदनाची कल्पना मांडतांना भारतीय मुसलमानहि हिंदपुत्रच आहेत हे स्पष्टपणे कबूल केलेले आहे: The foreign element amongst us is quite negligible and we are as much sons of the soil as the Hindus are. हे सदर प्रोफेसरांच्या पुस्तकांतील वाक्य राजेंद्रबाबूंनी आपल्या 'पाकिस्तान' सांवाच्या पुस्तकाच्या पृष्ठ १५ वर उद्धृत केले आहे.