पान:पाकिस्तानचे संकट.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री १९७ थान्यालाहि उभा राहणार नाही. हिंदुसमाजानें गांधीजींवर श्रद्धा ठेविली व त्या समाजाला गांधीजींच्या म्हणण्याचा जो अर्थ कळला त्याप्रमाणे त्याने हैं अहिंसातत्त्व आचरणांतहि आणले. पण, हिंदूंनी जे कांहीं केलें तें गांधीजींच्या मनाला रुचलें नसावें, असे दिसते. गेल्या एप्रिल-मे महिन्यांत डाक्का, अहमदाबाद इ० शहरांत जे भीषण दंगे झाले त्यांच्याबद्दलचे आपले म्हणणे ता. ४ मे १९४१ रोजी काढिलेल्या पत्रकाच्या द्वारा गांधीजींनी लोकांपुढे मांडले होते. या पत्रकांतील पुढील भाग विचारार्ह आहे : From accounts received, it seems that Muslim fanatics in Dacca and Ahmedabad did their worst in inflicting damage on Hindu property by looting and burning with a deliberation that showed pre-meditation. Hindus, instead. of boldly standing up and facing the mischief-makers fled in their thousands from the danger-zone; and, where they did not, they were as barbarous as the assailants. These were all untouched by the Congress non-violence; and yet, these are the men who form the bulk of the Congress meetings. If the Congress has no control over the masses on such occasions, there is not much value in Congress non-violence, as a positive force. (हाती आलेल्या माहितीवरून असे दिसतें कीं, डाक्का व अहमदाबाद येथील मुसलमान माथेफिरूंनी हिंदूंची मालमत्ता लुटून व जाळून तिचा नाश करण्याची परमावधि केली. या करण्यांत जो पद्धतशीरपणा दिसला त्यावरून त्याच्यामागें पूर्वसंकल्प असला पाहिजे, असे दिसते. या माथेफिरूंना धैर्याने तोंड देण्याऐवजी व त्यांच्या नजरेला नजर भिडविण्याऐवजी हजारों हिंदु संकटग्रस्त भागांतून पळून गेले. ज्यांनी असे केले नाही त्यांनी हल्ला करणाऱ्या माथेफिरूंइतकाच रानटीपणा दाखविला; काँग्रेसच्या अहिंसातत्त्वाचा यापैकी कोणालाच संपर्क झाला नव्हता. आणि मौज अशी की, काँग्रेसच्या सभांना गर्दी असते ती अशाच लोकांची! अशा प्रसंगी लोकसमहावर काँग्रेसची हुकमत चालत नसेल तर, काँग्रेसच्या अहिंसेला एक विधायक शक्ति म्हणून फारशी किंमत नाही, असे म्हणावे लागेल.) काँग्रेसच्या सभांना हजर राहणाऱ्या हजारों लोकांनी अहिंसातत्त्वाचा