पान:पाकिस्तानचे संकट.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या प्रकर प्रकरण १२ व.. काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री । __बंगालचे दिवंगत देशभक्त बाबू बिपिनचंद्र पाल यांनी आपल्या The Soul •of India या पुस्तकांत एका साधूची एक गमतीदार गोष्ट सांगितली आहे. हा साधु कलकत्त्यानजीक कालिघाट येथे राहात असे. राहण्याच्या जागेनजीक त्याने बागबगीचा केला होता व त्यांत त्याने फुलझाडे व फळझाडे लाविली होती. एके दिवशी एक बैल त्या बागेत शिरला. त्याबरोबर बैलाला हाकलण्याच्या बुद्धीने साधुमहाराज धांवत सुटले. ते बैलाजवळ आले; पण, तो बैल ज्या समाधानाने बागेतील वस्तूंचा फन्ना उडवीत होता तें समाधान पाहून ते साधुमहाराज निःशब्द व निश्चल अशा स्थितीत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांवाटे अश्रूचा प्रवाह सुरू झाला. बागेतील झाडांची कोवळी पाने व कोंब नाहीसे होत आहेत हे त्यांना दिसत होते व त्या झाडांच्या दुःखाने साधुमहाराजांचे मन दुःखित होत होते. पण, या दुःखाबरोबरच त्यांच्या मनांत दुसराहि एक विचार उद्भवला होता. या बैलाच्या समाधानाचा भंग मी कसा करूं, अशा विचाराने ते गोंधळांत पडले होते. शेवटी त्यांचे मन अस्वस्थ झाले आणि जगांत अशी द्वंद्वे निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या हेतूंचे ते चिंतन करूं लागले ! । वरील गोष्टींतील साधु आणि काँग्रेसची सूत्रे हाती घट्ट धरून ठेवणारे गांधीजी यांच्यामध्ये पुष्कळ साम्य आहे. त्यांना हिंदूंच्या हलाखीबद्दल आणि हालांबद्दल अजिबात कांही वाटतच नसेल, असे म्हणणे कठिण आहे. पण, हिंदूंच्या हालांबद्दल आपण काही म्हटले तर मुसलमानांचे समा. धान भग्न केल्याचा दोष आपल्याला लागेल अशी भीति त्यांना वाटत असली पाहिजे. गेली वीस वर्षे गांधीजी हिंदुस्थानांतील सर्व लोकांना अहिंसेची शिकवण देत आलेले आहेत. ही शिकवण मुसलमानांना मानवण्यासारखी नव्हती; आणि आजच्या मुसलमानसमाजाच्या वर्तनाचे व प्रवत्तीचे निरीक्षण केलें तर, असे स्पष्ट दिसते की, यापुढे तर तो समाज अहिंसावादाच्या