पान:पाकिस्तानचे संकट.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी मानांना नव्या सवलती देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. डॉ. आंबेडकरांचा तिसरा प्रश्न अशा रीतीने आपोआपच निकालांत निघतो. पाकिस्तान कबूल करावयाचें की सत्ताविभागणीत मुसलमानांना ५० टक्के जागा देऊन त्यांना संतुष्ट राखावयाचे, असे दोनच प्रश्न हिंदुसमाजापुढे आ वासून उभे आहेत आणि त्यांतल्या कोणत्या तरी एकाचा स्वीकार करण्याशिवाय हिंदुसमाजाला गत्यंतर नाही, अशी डॉ. आंबेडकरांच्या चौथ्या मुद्यांतील गभित सूचना आहे. ही सूचनाच बरोबर नाही. हिंदुसमाज या दोहोंपैकी कोणत्याच गोष्टीला मान्यता देणार नाही. हिंदु समाजाच्या जबरदस्त विरोधाला अव्हेरून इंग्रज सरकार मुसलमानांना यांतलें कांहींहि देऊं लागेल तर, संघटनेने सबल झालेला हिंदुसमाज 'इंद्राय तक्षकाय स्वाहा' या न्यायाने, स्वतःचा स्वाभिमान सिद्ध करण्यासाठी, काय करावयाचें तें अवश्यमेव ठरवील ! बर्वे टेलरिंग फर्मनें गेल्या १२ वर्षांत उत्तम त-हेने केलेली पुर्णकरांची सोय उत्तम, मोहक टेलरिंग || ME उत्कृष्ट, सुंदर निरनिराळ्या डिझाइनचा, वलन, कॉटन, रेशमी वगैरे सर्व प्रकारचा कापड माल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण - । उत्तम क्लॉथ स्टोअर्स प्रो. के. एल. बर्वे, अप्पा बळवंत चौक, पुणे २.