पान:पाकिस्तानचे संकट.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ . पाकिस्तानचे संकट पांच मुद्दे काढले आहेत. त्या मुद्यांपैकी काही मुद्यांचा परामर्श येथे घेणे श्रेयस्कर ठरणार आहे. हिंदुस्थानच्या राजकीय प्रगतीला हिंदुमुसलमान ऐक्य अवश्य आहे काय, असा डॉ. आंबेडकरांचा पहिला प्रश्न आहे. त्याचे स्पष्ट उत्तर नकारार्थी आहे हिंदुमुसलमानांच्यामध्ये द्विराष्ट्रवादाची अभिनव कल्पना नांदत असूनहि, हे ऐक्य अवश्य असेल तर, तें साधू शकेल काय ? हा पहिल्या मुद्यांतला पोटमद्दा म्हणून त्यांनी मांडला आहे. मुख्य मुद्याचे नकारार्थी उत्तर दिल्यामुळे, या पोटमुद्याचे उत्तर देण्याचे वस्तुतः कारणहि नाही. पण, ओघाने एवढे म्हणण्याला हरकत नाही की, द्विराष्ट्रवादांत अंतर्भूत असलेला मुसलमानांच्या स्वतंत्र राष्ट्राचा वाद हा शुद्ध वितंडवाद आहे आणि त्याला काडीचाहि ऐतिहासिक आधार नाही. हिंदु-मुसलमान ऐक्य शक्य असेल तर तें देवाण-घेवाण पद्धतीच्या मार्गाने व्हावें की आराधनेच्या (Appeasement) पद्धतीने व्हावे असा डॉ० आंबेडकरांचा दुसरा प्रश्न आहे. हिंदुमुसलमानांचे ऐक्य अवश्य नसले तरी, तें शक्य कोटींतले आहे. मुसलमानांची परंपरासिद्ध वृत्ति आहे तशीच राहिली तर हिंदूंनी त्यांच्याशी केलेली देवाण-घेवाणीच्या स्वरूपाची तडजोड देखील आराधनेसारखी किंवा शरणागतीसारखी ठरणार आहे. सबब, अशी तडजोड इष्टहि नाही आणि शक्यहि नाहीं. ज्यांच्यामध्ये तडजोड घडावयाची त्या दोघाहि पक्षांमध्ये समंजसपणा असावा लागतो. आजवर समंजसपणाचा सर्व मक्ता हिंदूंनी घेतला होता आणि त्यामुळेच मुसलमान समाजांतील असमंजसपणा वाढत गेला. हिंदुसमाज सामूहिक दृष्टीने असहिष्णु बनेल ही भीति जशी निराधार आहे तद्वतच तो समाज असमंजस बनेल ही भीतीहि निराधारच आहे. समंजसपणाच्या वृत्तीची वाढ मुसलमानांच्या ठिकाणी झाली पाहिजे. समंजसपणाचे बीजारोपण आपण आपल्या मनोभूमीत करीत आहों हे हिंदू समाजाला पटवून देण्याची जबाबदारी मुसलमान समाजावर ओघानेच येऊन पडत आहे. आपला हृदयपालट झाला असल्याची खात्री हिंदुसमाजाला पटावी म्हणून, मुसलमानसमाजाकडून यापूर्वी सूचित केलेला वर्तनक्रम आचरिला जाण्याची अत्यंत जरुरी आहे. परिस्थिति अशा प्रकारची असल्यामुळे, हिंदूंनी मुसल