पान:पाकिस्तानचे संकट.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० पाकिस्तानचे संकट मुसलमान समाजाने ठिकठिकाणी सभा करून, घडलेल्या या सर्व प्रकारांबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि या प्रकारांचे उत्तरदायित्व ज्यांच्यावर आहे त्या सर्वांचा त्यांनी प्रकटपणे निषेध केला पाहिजे. । हृदयपालटाची ही प्राथमिक चिन्हें दिग्दर्शित केल्यावर मुसलमानांनी इतर कांहीं मुद्यांकडे वळले पाहिजे. मुसलमानांच्या प्रार्थनेच्या वेळा आणि हिंदूंच्या धार्मिक रूढींचा संकोच यांचे समीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षांत अत्यंत दृढ झालेले आहे. आणि त्यामुळे हिंदूंना आपले धार्मिक व सामाजिक व्यवहार करतांना उगीचच चोरटेपणाने वागावे लागत आहे. यापुढे हिंदूंना या बाबतीत कोणताहि त्रास होणार नाही, ... अस्तित्वात असलेल्या आमच्या मशिदी कोटहि असल्या आणि त्या मशिदीत केव्हांहि प्रार्थना चालत असल्या तरी त्यांचा उपसर्ग भोवतालच्या लोकसमूहाच्या जीवनाला लवमात्रहि पोचणार नाही अशी जाहीर व कायदेशीर हमी मुसलमानांनी दिली पाहिजे. घडलेल्या वृत्ति-पालटाचे आणखी एक गमक म्हणन मुसलमानांनी Caste Disabilities Removal Act सारखे कायदे रद्द करून टाकण्याला संमति दिली पाहिजे. या निमित्ताने मुसलमानांना धर्मांतराची सर्वच बाब डोळसपणाने आणि प्रांजलपणाने हाती घ्यावी लागेल. एकादा प्रौढ मनुष्य जाणून बुजून, उघड्या डोळ्यांनी ख्रिस्ती अगर मुसलमान झाला तर, हिंदुसमाज त्याची कीव करील; पण तो समाज प्रायः त्याच्या आड येणार नाही. इतकें विचारस्वातंत्र्य हिंदु समाजाच्या अंगवळणी पडलेले आहे. पण, सध्यां जी नेणत्या माणसांची धर्मांतरे होतात अगर सक्तीने धर्मांतरे केली जातात ती मात्र हिंदुसमाज यापुढे सहन करणार नाही. धर्मांतर ही बाब अलीकडच्या कांहीं लग्नपद्धतींप्रमाणे नोंदली जावी आणि धर्मांतर करणाऱ्या इसमाला वंशपरंपरेने मिळणाऱ्या मिळकतीवर तरी हक्क सांगतां येऊ नये, अशी हिंदुसमाजाची या बाबतींतली किमान अपेक्षा आहे. या अपेक्षेत अन्याय्य अगर अप्रामाणिक असें कांहींच नसल्यामुळे, मुसलमान,