पान:पाकिस्तानचे संकट.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

र मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी १९१ खिस्ती वगैरे सर्व अहिंदू समाजांनी हिंदुसमाजाच्या या मागणीला पाठिंबा दलाच पाहिजे. मुसलमानसमाज हा पाठिंबा न देईल तर, हिंदुसमाज त्याच्या हृदयपालटावर विश्वास ठेवणार नाही. - . हृदयपालट झाल्याची काही दृश्य गमकें म्हणून मुसलमान समाजाने या गोष्टी केल्या तरीहि, एक मुद्दा शिल्लक उरणारच. वाणापानी स्वामी श्रद्धानंदजींसारख्या सर्वमान्य हिंदूंची हत्या घडलेली आहे ही गोष्ट हिंदुसमाज कालत्रयींहि विसरणार नाहीं! गुरु सांदीपनीच्या संतोषासाठी श्रीकृष्णाने सांदीपनीचा मेलेला मुलगा पुनः जिवत करून आणला. हिंदुसमाजाच्या संतोषासाठी मुसलमानांनी श्रद्धानदीसारख्या विभूतींना फिरून जिवंत करून आणावें असाहि हट्ट हिंदु समाजाने धरला तर तो गैर ठरणार नाही. पण जी गोष्ट व्यवहाराने शक्य नाही तिचा भलताच आग्रह हिंदुसमाजाने धरूं नये, असा सल्ला हिंदुसमाजाला देतां येईल; पण, श्रद्धानंदजींच्या स्वर्गस्थ आत्म्याला संतोषप्रद अशी एकादी ठसठशीत गोष्ट मुसलमानांनी केली पाहिजे हा आग्रह मात्र हिंदुसमाजाला अवश्य धरतां येईल आणि तो त्याने न चुकतां धरावाहि. अशी ठसठशीत गोष्ट कोणती या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडून अनेक तन्हांनी उदले जाण्याचा संभव आहे. पुष्कळांना मान्य होण्यासारखे एखादें उत्तर सुचवून ठेवणे एवढेच तूर्त शक्य आहे. सर्व ठिकाणच्या लहानथोर हिंदूंना अत्यंत पवित्र असलेलें काशी क्षेत्रांतलें श्रीविश्वनाथाचे प्राचीन मंदिर आज मशीद या स्वरूपांत उभे असून, त्यामुळे लक्षावधि हिंदूंच्या भावना दररोज दुखावल्या जात आहेत. या मशिदीच्या जागी मुसलमान समाजाच्या खर्चाने श्रीविश्वनाथाचे मंदिर पूर्ववत् उभे करण्याला मुसलमान समाज तयार होईल तर हिंदुसमाजाचें उदार मन निश्चित असे समजेल की, मुसलमानांच्या वृत्तीत घडून आलेला पालट टिकाऊ आहे. 'हे मंदिर फिरून प्रतिष्ठेने उभे करणे पूर्वीच्या हिंदुसत्ताधाऱ्यांना साधले नसते,