पान:पाकिस्तानचे संकट.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी १८९ तसे त्यांनी म्हटलें नाहीं हे त्यांचें औदार्य होय. हे औदार्य मुसलमानांनी मान्य केले पाहिजे. संख्यादैन्यामुळे संरक्षणार्हच जर कोणी असतील तर ते अहिंदु नसून हिंदूच आहेत; कारण, अहिंदूंचीच वृत्ति आक्रमणशील आहे. ही इतिहाससिद्ध गोष्ट मान्य करून, वायव्य सरहद्दीनजीकच्या मुसलमानांनी तेथील हिंदु व शीख यांच्या संयुक्त समूहाला भरपूर संरक्षण देण्याची तयारी दाखविली पाहिजे. या सध्यांच्या प्रांतरचनेच्या दृष्टीने प्रांतांपुरता हा प्रश्न सुटल्यानंतर, मुसलमानांनी आपल्यांतील हृदय-पालटाचे आणखी एक चिन्ह म्हणून असें कबूल केले पाहिजे की, मध्यवर्ति-सत्तेच्या उपभोगाच्या वेळी संरक्षण देण्याघेण्याचा प्रश्न शिल्लकच उरत नाही. धार्मिक आचारस्वातंत्र्य वगैरे गोष्टींसाठी संरक्षण इष्ट व अवश्य असेल तर, ते संरक्षण प्रांतांच्या कक्षेपुरतेच मर्यादित आहे. मध्यवर्ति कारभाराशी या प्रश्नांचा अर्थाअर्थी कांहीहि संबंध नाहीं ही गोष्ट प्रांजलपणे मान्य करून, मध्यवर्ति विधिमंडळाच्या निवडणुकीपासून प्रत्येक बाबतीत मुसलमानांनी व इतर अहिंदूंनी हिंदूंशी संयुक्त रीत्या व्यवहार कर ण्याला तयार झाले पाहिजे. । हृदयपालट झाल्याचे लक्षण म्हणून मुसलमान या गोष्टी करतील तर, ब्रिटिश राज हिंदुस्थानपुरता प्रश्न पुष्कळच लौकर सुटेल आणि तो सुटण्याच्या मार्गाला लागला की, संस्थानिक, त्यांची प्रजा व त्या उभयतांचे भारतीय सरकारशीं संबंध हेहि प्रश्न सहज सुटतील. हृदयपालट झाल्याची एक खूण म्हणून मुसलमानांनी ही गोष्ट तर केलीच पाहिजे. पण, एवढीच गोष्ट केल्याने हिंदूंच्या साशंकवृत्तीचे पूर्ण समाधान 6 होणार नाही. १९२१च्या मलबारमधील मोपल्यांच्या बंडापासून अगदी ताज्या असलेल्या डाक्का वगैरे ठिकाणच्या अस्वस्थतेपर्यंत जे हिंदुविघातका प्रकार सतत घडत आलेले आहेत त्या प्रकारांचा मुसलमानांनी साधा शाब्दिक कोण निषेधहि केलेला नाही. आपल्या चित्तवृत्तीत दिसू लागलेला पालट संधिसाधपणाचा नसून तो मनाच्या तळमळींतून निघालेला आहे हे हिंदूंना पटवन देण्यासाठी