पान:पाकिस्तानचे संकट.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट मुसलमान हिंदूंच्या पुढे व जगापुढे पाकिस्तानची मागणी तावा तावाने मांडीत आहेत. वेळीच बऱ्या बोलाने आमची ही मागणी मान्य न होईल तर आज भारताच्या तृतीयांश तुकड्यावर संतुष्ट होऊ पाहणारे आम्ही मुसलमान उद्यां निम्मा हिंदुस्थान मागं व,वामनाच्या व्यापक पावलांचे अनुकरण करून,परवां कदाचित् सगळाच हिंदुस्थान आत्मसात् करूं अशी दटावणीची भाषा बॅ०जीनांनी मद्रास येथील लीग-अधिवेशनाचे वेळी गेल्या एप्रिलमध्ये काढली. या भाषेमुळे भेदरून गेलेले गयाळ वत्तीचे कांहीं देशभक्त, 'कसेंहि करून अखंड हिंदुस्थान राहिला म्हणजे मिळविली, मग प्रत्यक्ष सत्तेची वाटणी कशीहि झाली तरी हरकत नाही,' अशा असहाय मनोवृत्तीच्या आहारी जाऊ लागले आहेत. अशा वेळी या पाकिस्तानच्या पैगंबरांना हिंदुसमाजाने शब्दाने व कृतीने कोणतें उत्तर द्यावयाचें हा आजचा प्रश्न आहे. पंजाबसारख्या मुसलमान बहुसंख्य प्रांतांतले मुसलमान देखील शें० ८५ या प्रमाणांत मूळचे भारतीय आहेत, असें खानेसुमारीचे काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी नमूद करून ठेविलें आहे. इतर प्रांतांतल्या मुसलमानांबद्दलहि असेंच विधान करतां येण्यासारखे आहे. भारतीय संतति म्हणुन हिंदंनी या लोकांना या भूमीत गेली कांहीं शतकें सहिष्णुवृत्तीने नांदं दिले. मोगली साम्राज्याच्या उत्कर्ष-काळांत मोगली सत्तेखाली गेलेले मुलूख शीख, मराठेप्रभृति पराक्रमी हिंदूंनी फिरून हिंदुसत्तेखाली आणिले होते. पण सीमाप्रांत, पंजाब, सिंध, बंगाल, काश्मीर वगैरे भागांतल्या सध्यांच्या मुसलमानांच्या पूर्वजांना त्यांनी खेचून हिंदुधर्मात परत आणलें नाहीं ! सिंधमधील ठठ्ठा (देवलबंदर) येथे देवलऋषि होऊन गेला व त्याने काळवेळ पाहून, दूरवरची दृष्टि ठेवून, मुसलमान झालेल्या पूर्व-हिंदूंना परत हिंदुसमाजांत घेण्याचा स्तुत्य उपक्रम केला. अशा रीतीने आठव्या शतकांत सिंधमध्ये पुष्कळ मुसलमान फिरून हिंदु झाले असें अल्बिलादुरी या मुसलमान इतिहासकाराने लिहून ठेविलें आहे.* मुसलमानांच्या हिंदूकरणाचा हा ___ *Modern Review, August 1941; The Linguistic Problem of Sind by Swami Jagadeeshwaranand.