पान:पाकिस्तानचे संकट.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ पाकिस्तानचे संकट चित्ताला लीगच्या या अवसानघातकीपणामुळे जबरदस्त धक्का बसलेला आहे. तेव्हां, _ कोणी हिंदु पुढारी आपल्यापाशी वाटाघाटी करावयाला येतील आणि आपण आपला कार्यभाग साधून घेऊ अशा भ्रमांत लीगमधील मुसलमानांनी व लीगच्या बाहेरील मुसलमानांनी यापुढे राहूं नये. बार्डोलीच्या जप्त जमिनी आपल्या पायाने चालत स्वगृही येतील असे विश्वासजनक उद्गार सरदार वल्लभभाई पटेल हे बार्डोलीच्या खेडुतांपाशी काढीत. असत. हिंदुस्थानचे स्वराज्य आपल्या पायाने चालत आमच्याकडे येईल असे विश्वासगर्भ उद्गार हिंदुलोक आतां काढू लागले असल्यामुळे, आपल्या अडेलतटूपणाला बाजारभाव येईल या समजुतीच्या धुक्यांतून बाहेर पडण्यांतच भारतीय मुसलमानांचे कल्याण आहे. देवाण-घवाणीच्या तत्त्वावर केलेला लखनौ-करार मोडून मुसलमानांनी गेल्या पाव शतकांत जे स्वार्थीपणाचे मुद्दे पदरांत पाडून घेतलेले आहेत त्या सर्वांवर पाणी सोडण्याची मुसलमान तयारी दाखवितील तरच यापुढे हिंदु त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेवण्याला प्रवृत्त होतील. हिंदुस्थानांतील परस्परविरोधी जमातींमध्ये व हितसंबंधांमध्ये सलोखा घडून येत नाही म्हणून ब्रिटिश मुत्सद्दी गळे काढकाढून रडत असतात. या कांगावखोर मुत्सद्याना हिंदुसमाज यापुढे हेच उत्तर देईल की, आमच्यांत झालेली एकी तुम्ही बिघडविलेली आहे; आणि, आमच्यांत एकी व्हावी अशी तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही त्या एकीत जो बिब्बा भरलात तो तरी तुम्ही बऱ्याबोलानें कि काढून घेतला पाहिजे. ब्रिटिश मुत्सद्दी जोपर्यंत ही गोष्ट करणार नाहीत, जातिनिर्णयांतील प्रांतरचना व मतदारसंघांची रचना या सर्व गोष्टी रद्द करून, लखनौ कराराने निमिलेली परिस्थिति पुनः निर्माण करण्याचा प्रामाणिकपणा ते जोवर दाखविणार नाहीत तोवर त्यांच्या कांगावखोरपणाला उद्देशून हिंदुसमाज । म्हणत राहील :