पान:पाकिस्तानचे संकट.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ११ वें मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी स्वातंत्र्यासाठी अधीर झालेले हिंदु मुसलमानांच्या आग्रहीपणामुळे अस्वस्थ हातील, ते त्यांच्याशी तडजोडीची भाषा बोलू लागतील आणि अशा तडजोडीच्या भाषेतून नेमकें पाकिस्तानच निर्माण झाले नाही तरी, सत्ता विभागणींत ५० टक्क्यांची मागणी तरी पदरांत पाडून घेता येईल, अशा भ्रमांत लीगवाले मुसलमान असतील तर शेवटी त्यांना पाश्चात्ताप करीत बसण्याची पाळी येईल! त्यांच्याशी वाटाघाटी करण्याला नेहमी उत्सुक असणारे काँग्रेसमधील हिंदु या दिशेनें कांहीं करतील अगर करूं शकतील असें मुसलमानांनी मानूं नये. काँग्रेस व लीग यांच्या दरम्यान जी मतभेदांची खोल गर्ता निर्माण झालेली आहे ती भरून निघण्यासारखी नाही, असें गांधीजींनी २५-४-१९४१ रोजी काढलेल्या पत्रकांत स्पष्टपणे म्हटलेलें आहे, माया (I admit that there is unfortunately an unbridgable gulf between the Congress and the Muslim League) Ž BTT a त्यांचे अनुयायी यांनी विसरूं नये. गांधीजींचे हे उद्गार स्वतः गांधीजीच विसर्स लागले अगर काँग्रेसमधील काही हिंदु पुढाऱ्यांना गांधीजींच्या या उद्वेगाचें विस्मरण झाले तरी, तेवढ्यानेहि भागण्यासारखें नाहीं हें लीगनें विसरूं नये. कारण, चाल युद्धाची पर्वणी आली असतां आणि त्या पर्वणीचा भरपूर फायदा घेण्याची शक्यता असतां, लीगच्या आडमुठेपणामुळे राष्ट्ररक्षणाच्या व राष्ट्रस्वातंत्र्याच्या प्रश्नाचा कसा चुथडा झाला, हे सघूसारखे नेमस्ताग्रणी,सावरकरांसारखे हिंदुराष्ट्रनेते व आंबेडकरांसारखे पूर्वास्पृष्टांचे नेते विसरतील असा संभव नाही. लीगने गेल्या वीस वर्षांत में जातिस्वार्थाचें आंधळे धोरण पत्करलें त्यावर लीगच्या या अवसानघातकीपणामुळे कळसच चढलेला आहे, ही भावना लोकनायक अणे यांच्यासारख्या सर्वमान्य हिंदु पुढाऱ्याच्या मनालाच त्रास देत नसून, ख्रिस्ती पुढारी, पारशी पुढारी, शीख पुढारी,अशा सर्वांच्याच