पान:पाकिस्तानचे संकट.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी १८७. स्वयं चक्षुराकुलीकृत्य अश्रुकारणं पृच्छति । ब्रिटिश मुत्सद्दी कांहींहि म्हणत राहिले, त्यांच्या कृपाप्रसादाने मिळणारे नामधारी स्वराज्य कितीहि लांबणीवर पडले, तरी हिंदुसमाज यापुढे अधीर होऊन आपल्याशी तडजोडीची व वाटाघाटीची भाषा बोलू लागणार नाहीं हें मुसलमान समाजाने पुरें ओळखून राहावें. लखनौ करारापर्यंत पुष्कळसे मुसलमान We are Indian first and Mussalmans afterwards असें म्हणत असत. या त्यांच्या म्हणण्याचा आशय असा असे की, मुसलमान म्हणून आमच्या भावना कांहींहि असल्या आणि मुसलमान म्हणून आमचे हितसंबंध कांहींहि असले तरी, हिंदुस्थानच्या हिताचा प्रश्न निघतांच आम्ही त्या भावना आणि ते हितसंबंध यांना दुय्यम स्थान दिल्याशिवाय राहणार नाही. ख्रिस्ती, पारशी वगैरे पुढारीहि त्या वेळी अशाच अर्थाची भाषा बोलत असत. आणि, अनुकरणप्रियतेमुळे अर्थशून्य शब्दप्रयोग करण्याची खोड हिंदूंच्या हाडींमाशी खिळलेली असल्यामुळे, कांहीं हिंदूहि त्यावेळी उगीचच म्हणत : We are Indians first and Hindus - afterwards. We are “ Indians " first (3177ER Hafzraff fact अगर भारतीय आहोत) हा वाक्प्रचार हिंदूंच्या तोंडी न शोभण्यासारखा आहे. कारण, भारतीयत्व आणि हिंदुत्व या गोष्टींचा विरोध असंभवनीयच असून, त्या दोन गोष्टींची व्याप्ती सर्वांशी सारखी आहे. मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू अशा लोकांनी हा वाक्प्रचार वापरावा हे बरोबर आहे. कारण, या सर्व जमातींतले लोक हिंदुस्थानच्या बाहेरहि असल्यामुळे, त्या बाहेरच्या लोकांशी संगनमत करून भारतीय हितावर निखारे ठेवण्याला आम्ही प्रवृत्त होणार नाही, अशी हमी (Guarantee) त्या वाक्प्र चारांत अभिप्रेत आहे. लखनौ-कराराच्या मागें मुसलमानांनी दिलेली ही हमी मूर्तिमंत उभी आहे. त्यानंतरच्या २५ वर्षांत मुसलमानांनी ही हमी पदोपदी मोडली असून,सध्यां तर मुसलमान हिंदुस्थानची चीरफाड करण्याशिवाय दुसरी भाषाच बोलण्याला तयार नाहीसे झाले आहेत. जगांत हिंदूंचा जर एका गोष्टीबद्दल विशेष लौकिक