पान:पाकिस्तानचे संकट.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० पाकिस्तानचे संकट - आणि समजा, पाकिस्तान प्रस्थापनेनंतर रातोरात आणि हातोहात मुसलमान पार बदलले आणि ते अगदी देव माणूस झाले तरी, कटकटी टाळण्यासाटी हिंदूंनी पाकिस्तान मान्य करावें हे म्हणणेच बुद्धीला आकलन होण्यासारखें नाहीं! कटकट टळावी हीच सर्वश्रेष्ठ इच्छा हिंदूंच्या मनांत नांदत असेल तर, त्यांनी पिंडाएवढा भात खाऊन प्रेताप्रमाणे पडून राहण्याला तयार व्हावें, म्हणजे झालें! मनाची ही तयारी झाली की सगळया कटकटींचे मूळच संपलें ! पण, हिंदु हे ज्या अर्थी इंग्रजांपासून स्वराज्य मिळविण्याला निघाले आहेत आणि तें स्वराज्य टिकविण्याची व चालविण्याची हिंमत ते मनांत बाळगीत आहेत त्या अर्थी त्यांना कटकटींचा कंटाळा आला असेल, असें दिसत नाही. कारण, स्वराज्य मिळविणे हे जसे कटकटीचे काम आहे तसेंच मिळालेलें स्वराज्य टिकविणें हेंहि कटकटीचंच काम आहे. केवळ देशांतील शांततारक्षणाचें काम करणाऱ्या व त्या कामासाठी प्रांतांकडून ओझ्यावारी पैसे कराच्या रूपाने घेणाऱ्या मध्यवर्ति सरकारची आवश्यकता तरी काय आहे, असें हिंदुहिंदुस्थानांतील काही प्रांत आज ना उद्यां म्हणू लागतील असें भेसूर भविष्य डॉ. आंबेडकरांनी वर्तविले आहे.* डॉ. आंबेडकरांचे हें भविष्य केवळ कल्पनानिर्मित नसेल, त्याला कांहीं आधार असेल तर स्पष्टपणे असें म्हणावें लागेल की, स्वराज्याची शाब्दिक मागणी करणाऱ्या हिंदूंना स्वराज्याचा व्यावहारिक अर्थच समजलेला नाही. 'पोट आणि अवयव' या जुन्या गोष्टींतला मतलब न ओळखून, हिंदु यापुढेहि खंबीर मध्यवति सरकार आणि राष्ट्ररक्षणाला समर्थ असें खंबीर, चतुरंग, अद्ययावत् लष्करी सामर्थ्य यांच्याकड दुर्लक्ष करणार असतील तर, स्वराज्याची सारी चळवळ समुद्राच्या खाया पाण्यात विरून जाईल, यात शंकाच नाही. स्वराज्य म्हणजे सैन्यसामर्थ्य ; आणि, तें सैन्यसामर्थ्य टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी राष्ट्राच्या सर्व अवयवांनी सिद्ध असणे हेच जबाबदारीचे स्वराज्य !

  • Thoughts on Pakistan, p. 7.