पान:पाकिस्तानचे संकट.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राष्ट्ररक्षण व शांततारक्षण हे सैन्यसामर्थ्य सिद्ध करतांना, परकी सरकारकडून आज होत असलेली उधळमाधळ होता कामा नये, हे खरे आहे. पण, ही उधळमाधळ टाळण्याचे घोरण सांभाळिल्यानंतर, सैन्याप्रीत्यर्थ जो खर्च होईल तो दुसऱ्या रूपानें सर्व प्रांतांना परत मिळेल, ही विचारसरणीच यापुढे वाढवीत राहिले पाहिजे. पांच पांच कोटी लोकसंख्येची चिमुकली राष्ट्र सध्यां सालोसाल परार्धावधि पौंड सैनिक-सज्जतेवर खर्च करीत असतात. एका हाताने होत असलेला हा खर्च दुसऱ्या हाताने परत मिळत असतो, यामुळेच या गोष्टी युरोप, जपान व अमेरिकेमध्ये घडतात. सैनिक-सिद्धतेमुळे पायदळ, घोडदळ, नाविकदळ; विमानदळ इत्यादि नानाप्रकारच्या दळांतून हजारों माणसांना कामें करावी लागतात आणि या माणसांना मिळणाऱ्या वेतनावर अशा हजारों माणसांच्या कुटुंबांतील लक्षावधि लोकांचा योगक्षेम चालतो. सैनिक-सिद्धतेसाठी देशांत शस्त्रनिर्मितीचे, विमाननिर्मितीचे, मोटार-निर्मितीचे असे हजारों कारखाने चालतात आणि या कारखान्यांत कामगारांना जें वेतन मिळतें तेंहि देशांतील लक्षावधि लोकांच्या उपजीविकेला उपयोगी पडते. अशा दृष्टीने विचार कल्यास, राष्ट्रीय व राष्ट्रहितदक्ष सरकारकडून केली जाणारी लष्करी सामर्थ्याची सिद्धता ही देशाच्या योगक्षेमालाच कारणीभूत होत असते. अशा सैनिक-सिद्धतेसाठी करभार देणे हे नागरिकांचे कर्तव्यच आहे. प्रजानामेव भूत्यर्थं स ताभ्यो बलिमग्रहीत् । सहस्रगुणमुत्स्रष्टुं आदत्ते हि रसो रविः ॥ या वचनांत सूचित केल्याप्रमाणे, सूर्य जसा पृथ्वीवर पर्जन्यवर्षाव करण्यासाठीच जलाचे शोषण करीत असतो तद्वतच, राष्ट्रीय सरकारहि सर्व देशावर समद्धीचा व सुबत्तेचा वर्षाव करण्यासाठींच कराच्या पैशांचे शोषण करीत असते. नुसतें राष्ट्ररक्षणाचे खर्चिक काम करणाऱ्या व राष्ट्रहितकारी उद्योगांत (Nation-building activities) प्रत्यक्ष न पडणाऱ्या मध्यवर्ति सरकारबद्दल कांहीं प्रांतांतून कांहीं गैरसमज असतील तर, त्या गैरसमजाची कोळिष्टके काढून टाकली पाहिजेत! डॉ. आंबेडकर त्या कोळिष्टकांना अप्रत्यक्षपणे थोमाळतात कसे, याचे आश्चर्य वाटतें! कटकटी टाळण्याचे डॉ. आंबेडकरांचे शास्त्र कांहीं अजब आहे! हिंदू