पान:पाकिस्तानचे संकट.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राष्ट्ररक्षण व शांततारक्षण १७९ लेखांतील उतारा डॉ. आंबेडकर यांनीच आपल्या पुस्तकाच्या पृष्ठ ११०१११ वर उदधृत केलेला आहे. साऱ्या हिंदुस्थानांत दोन राष्ट्र आहेत असें बुजगावणे उभे करून हिंदूंना भेडसावणाऱ्या मुसलमानांची पाकिस्तानची मागणी डॉ. आंबेडकर म्हणतात त्या मर्यादित स्वरूपांतहि मान्य झाली तर पुढे काय होईल हे या उताऱ्यावरून अनुमानितां येईल. शांतता पदरात पाडून घेण्याच्या सद्बुद्धीने हिंदूंनी एकदा पाकिस्तानच्या मशिदीत प्रवेश केला की, ती मशीद त्यांच्या गळयांत लोढण्यासारखी बसलीच म्हणून समजावें! हिदुस्थानांत उरलेले दोन कोट मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्रच आहेत, ही कबुली पाकिस्तान-मान्यतेच्या पोटांत दडून बसलेली आहे. या कबुलीच्या शिडीनें चढत चढत जाऊन, मुसलमान सैन्यासकट प्रत्येक ठिकाणी निम्मेनिम जागा मागण्याला चुकणार नाहीत, याविषयी कोणाहि हिंदूनें पूर्ण खात्री बाळगावी. म्हणजे अर्थ असा की, डॉ. आंबेडकर म्हणतात त्या अर्थाने पाकिस्तानची मागणी मान्य केल्यावर, 'बापापरी बाप गेला, नि बोंबलतांना ओंठ गेला' हेच म्हणण्याचा हिंदवर प्रसंग येईल! आणि, हिंदुस्थानची अंतर्गत शांतता तरी या पद्धतीने कितीशी टिकणार आहे ? पाकिस्तान प्रस्थापनेनंतर पाकिस्तानमधील मुसलमान आणि हिदुस्थानांत उरलेले मुसलमान यांचे सबंध अजिबात बंद पडणार आहेत असा अर्थ मुळीच नाही. पाकिस्तानमधील मुसलमान आपली स्वतंत्र मुस्लिमराज्ये ही आपल्या राष्ट्राचे बालेकिल्ले समजणार आणि तेथे बसून तेथे आपले इस्लामी पाय पक्के रोवून-हिंदुस्थानांतल्या मुसलमानांच्या हितसंवर्धनाकडे ते डोळ्यांत तेल घालन लक्ष देणार! त्यांच्या जोडीला त्यांच्या कार्यांतील सहकारी म्हणून हैद्राबादच्या निजामचें स्वतंत्र मुस्लिम-राज्य हिंदुस्थानच्या काळजाला भिडल्यासारखें शिल्लकच राहणार! अशा परिस्थितीत, हिंदुस्थानच्या हिंदूंनी अंतर्गत शांतता टिकण्याची आशा धरावयाची आहे! ही आशा मगजळाप्रमाणे फसवीच ठरेल हे सांगण्याला एकादा चाणक्य हवा, असे मुळीच नाही. मसलमान लोक सूडेटेन जर्मनांचे उदाहरण देण्याची पोपटपंची वारंवार करीत असतात; त्यावरूनच, हिंदुस्थानांत अंतर्गत शांतता टिकण्याची शक्यता कितपत आहे हे कोणाहि हिंदूला सहज समजू शकेल.