पान:पाकिस्तानचे संकट.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ पाकिस्तानचे संकट एकच उत्तर दिले पाहिजे. आपलें धार्मिक वैशिष्टय टिकविण्यापुरतें स्वातंत्र्य घेऊन येथे राहण्याची तुमची इच्छा असेल तर तेवढे स्वातंत्र्य मागण्यापुरताच तुम्हांला अधिकार आहे; यापलीकडे तुमचा कोणताहि अधिकार येथें मान्य होणार नाहीं; हिंदुस्थानची हिंदुसत्ता तुम्हाला सहन होत नसेल तर हा देश सोडून अरबस्थानांत, साहारा वाळवंटांत अगर तुमचे लाड करणाऱ्या इंग्रजांच्या इंग्लंडांत जाऊन राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे; आणि तो तुम्ही जितक्या लवकर गाजवाल तितकें श्रेयस्कर ठरणार आहे—हें एकच उत्तर मुसलमानांची समजूत पडण्याला पुरेसे आणि प्रभावी ठरणार आहे. या दृष्टीने भोंवतालच्या सृष्टीकडे पाहूं लागल्यावर, डॉ. आंबेडकर यांना संरक्षणाबाबतचे आपले निष्कर्ष बदलण्याची बुद्धि झाल्याविना राहणार नाही, असें मानण्याला हरकत नाही. पंजाबमधील कांही जिल्हे निहिन्दु बनवून आणि बंगालमध्येहि तोच प्रकार घडवून आणून डॉ० आंबेडकरांनी जे पाकिस्तान बनविण्य चा सकल्प केला आहे त्या पाकिस्तानच्या सिद्धीमुळे एक कटकट कायमची मिटेल अशी डॉ. आंबेडकरांची समजूत आहे. आज हिंदुस्थानच्या प्रत्येक प्रांतांत हिंदु व मुसलमान यांची संमिश्र वस्ती असल्यामुळे आणि उभ्या हिंदुस्थानांत एकंदर लोकसंख्येपैकी चौथा हिस्सा लोकवस्ती मुसलमानांची असल्यामुळे, प्रांतिक सरकारें व मध्यवर्ति सरकार या सगळ्यांचीच घडण संमिश्र बनते आणि उठल्याबसल्या मुसलमानांच्या प्रश्नाचे भेडसावणारें भत मानगुटीस बसते, तें शक्य तोंवर थांबावें असें डॉ० आंबेडकरांना मनापासून, प्रामाणिकपणाने वाटत आहे. त्यांनी संकल्पिलेलें मर्यादित स्वरूपाचें पाकिस्तान सिद्ध झालें तर, आज हरघडी होणारे जातीय बखेडे थांबतील असाहि डॉ. आंबेडकरांचा समज आहे. आणि या महत्त्वाच्या गोष्टी हाती पडण्यासाठी, सिंघ, वायव्यसीमाप्रांत, बलुचिस्थान व पंजाबचे कांहीं जिल्हे यांचे मिळून एक मुस्लीम राज्य आणि पूर्वबंगालचे काही जिल्हे आणि सिल्हेट हा आसाममधील जिल्हा यांचे मिळून दुसरें मुस्लिमराज्य स्थापन होण्याला हरकत नसावी, अशी डॉ. आंबेडकरांची विचारसरणी आहे. अशी मुस्लिम राज्य स्थापल्याने हिंदुस्थानांतल्या हिंदूंच्या मागची मुसलमानांची कटकट खरोखरच थांबणार आहे की काय, या प्रश्नाचें नकारार्थी उत्तर देणारा मि० रहमतअल्ली यांच्या