पान:पाकिस्तानचे संकट.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तान : शब्द व कल्पना दीर्वकाल मुरलेला असेल तेव्हां रोगचिकित्सा करून औषधोपचार करणाऱ्या वैद्याला जास्त दक्षता घ्यावी लागते व खंबिरी दाखवावी लागते. हे ओळखून, मुसलमानांच्या या मागणीच्या मागे लपून बसलेल्या विचारसरणीशी हिंदूंनी झगडले पाहिजे. मुसलमानांच्या या मागणीचे स्वरूप राजकीय असूनहि तिला धर्मकारणाचा वा धर्माधतेचा इतका उग्र दर्प का यावा असा प्रश्न उपस्थित होतो. धर्म असलाच तर तो व्यक्तिव्यवहारापुरताच मर्यादित आहे, राजकारणासारख्या . सार्वजनिक व्यवहाराशी त्याचा काडीचाहि संबंध नाही, असें मानावयाला शिकलेल्या अगर सवकलेल्या आधुनिक पढिकांना तर असे वाटते की,राजकीय मागण्यांचे हे धर्मप्रधान स्वरूप नैसर्गिक नसून, मुसलमान समाजांतल्या मूठभर लब्धप्रतिष्ठितांनी स्वतःची पोळी पिकविण्यासाठी राजकारणाला हा धर्माभिमानाचा मुलामा दिलेला आहे. पण, जगांतील मानव समाजाची 'इस्लामी जग' दतबाह्य असणारे 'शत्रुजग'ही विभागणी सध्यांच्या मूठभर सुशिक्षित मुसलमानांनी केलेली नसून, या विभागणीमागील विकृत मनोरचनेमुळेच मुसलमान हिंदुस्थानांत व इतरहि देशांत शतकानुशतकें धुडगूस घालीत आलेले आहेत. मुसलमानांची मशीद ही नुसती प्रार्थनेची जागा नसून, मुसलमान समाजाच्या सगळ्या सामुदायिक जीवनाची कळ तेथून फिरत असते असें मुसलमान लोक अभिमानाने सांगतात.* त्यांतलें इंगितच हे की, बाकीच्या जगाने धर्मकारण व राजकारण यांच्यामध्ये चिनी भिंत खुशाल उभारली तरी तशी भिंत उभारण्याला मुसलमान तयार होणार नाहीत. आक्रमक वृत्तीने जगभर नांदावें व साऱ्या जगांत इस्लामी क्रांति घडवून आणावी अशा उमद्या' महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेले *Religion and Politics are inseparably associated in the minds and thoughts of all Muslims.... Their religion includes their politics and their politics are a part of their religion. The mosque not only constitutes the place of worship but also the Assembly hall....It forms a centre of all aspects of their public life--religious, social, economic and political. ---Confederacy of India by A Punjabi, pp. 88-89.