पान:पाकिस्तानचे संकट.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७१ . राष्ट्ररक्षण व शांततारक्षण हिंदी सैन्य, हिंदीप्रजा, हिंदी संस्थाने या सगळ्यांना गोगलगाई बनविण्यांत हिंदुस्थान सरकारची व ब्रिटिश सरकारची केवही भयंकर चूक होत आहे हे जगाच्या भवितव्याचा दूरदर्शीपणाने विचार करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी. १९०२ साली हेरलें होतें. "युरोपांतील बलाढ्य राष्ट्रांमध्ये जी चढाओढ चाललेली " आहे ती ज्या वेळी निकरास येईल तेव्हां, अशा रीतीने मृतप्राय " केलेल्या हिंदुस्थानचें इंग्लंडच्या गळ्यांतील ओझें इंग्लंडास "असह्य नाहीं तरी अडचणी झाल्याखेरीज राहणार नाहीं "* हा इषारा किती बरोबर होता हे चालु यद्धाच्या सुरुवातीपासून हिंदूंना समजले आहे; आणि, हिंदुस्थान सरकारलाहि ते समजले अस.वें असें मानले तर तें फारसें चुकण्यासारखे नाही. गेल्या महायुद्धानंतर युरोपांत असंतोष फैलावला आणि व्हर्सायच्या तहांतून आज ना उद्यां नवें महायुद्ध निर्माण होणार ही शक्यता स्पष्टपणे दिसू लागली. त्या वेळींहि हिंदुस्थानच्या रक्षणाच्या प्रश्नाची चिता ज्यांना वाटत होती अशी मोठमोठी माणसें देशांत होती. कै० मोतिलालजी नेहरू. हे थोर देशभक्त अशा लोकांपैकी एक होते. लष्करी प्रकरणांतील गुहयांची माहिती मिळणे आणि लष्करी शिक्षणाचा देशांत फैलावा होणं या गोष्टींना ते म्नाने किती महत्त्व देत होते हे कानपूरच्या राष्ट्रीय मभेच्या वेळी विषय नियामक समितींत झालेल्या चर्चेवरून स्पष्ट होत आहे. पडितजी त्या वेळी दिल्लीच्या अॅसेंब्लीत स्वराज्य पक्षाचे नेते होते. सरकारी समित्यांवर स्वराज्य पक्षांतील सभासदांनीं जाऊं नये असा आग्रह त्या वेळी रूढ होता. त्या आग्रहाकडे पाठ फिरवून पंडितजीनी स्कीन कमिटीवर काम करण्याचे ठरविले. विषय-नियामक-समितीत पंडितजींना याबद्दल जाब द्यावा लागला. आपण स्कीन कमिटीवर का गेलों हे सांगतांना पडितजींनी असा खुलासा केला की, लष्करी प्रकरणांचे गुप्त कागद एरवीं 'आम्हांला पाहावयाला मिळाले नसते, ते आम्हांला कमिटींत दाखविण्यांत येतात. " लष्करी शिक्षणाचा अभाव हेच आमच्या दुबळेपणाचे कारण 1. *लो. टिळकांचे केसरींतील लेख, राजकीय खंड २, पृ० ३१५.