पान:पाकिस्तानचे संकट.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० पाकिस्तानचे संकट ___ सैन्यासाठी लागणारा पैसा हिदूंनी द्यावा, सैन्यांत भरणा मुसलमानांचा असावा आणि एखाद्या मुसलमान शत्रूशी लढण्याचा प्रसंग आला तर, हिंदूंच्या पैशावर पोसलेल्या या मुसलमान शिपायांनी ऐन वेळी दगा द्यावा अगर उघड जाऊन शत्रूला मिळावें ही परिस्थिति किती चिंताजनक आहे, हे हिंदूंच्या लक्षात येण्याच्या दृष्टीने डॉ० आंबेडकर यांचे विवेचन फार उपकारक आहे. हिंदुस्थानच्या अंतर्गत शांततेसाठी जे सैन्य पोसले जाते त्यांत युरोपियनांचा भरणा पुष्कळ असतो.हे खरे; पण सैन्याच्या या विभागांत जी हिंदी सैनिकांची संख्या असते त्या संख्येतहि मुसलमानांचा भरणाच मोठ्या प्रमाणावर केलेला असतो ही गोष्ट तर केवळ चिंताजनक नसून, अत्यंत घातक अंशी आहे; कारण, मुसलमान व हिंदु या दोन समाजांच्या मनोवृत्तींचा व संवयींचा तुलनात्मक विचार करणाऱ्या कोणाहि इसमाला हे मान्य करावे लागेल की, कसल्याहि खऱ्याखोट्या कारणामुळे प्रक्षुब्ध होऊन, शांतताभंग करण्याला प्रवृत्त होण्याची मनोरचना हिंदूंपेक्षां मुसलमानांमध्येच जास्त प्रबळ आहे. अंतर्गत शांततेचा गेल्या अठरा वीस वर्षांत वारंवार होत असलेला बिघाड, मुसलमानांविरुद्ध मुसलमान सैनिकाने शस्त्र उचलतां कामा नये या शिकवणुकीचा होत असलेला प्रचार व पुरस्कार, ब्रिटिश सत्ता नष्टप्राय झाली असें सहज समजण्याचा मुसलमान लोकांच्या मनाचा कल इत्यादि सर्व गोष्टींचा येथील सत्ताधारी सरकारने १९२१ सालच्या मोपल्यांच्या बंडापासून तरी नीट विचार केला असता तर, ब्रिटिश सरकारपुढे व हिंदुस्थानांतील हिंदूंपुढे आज उभा असलेला बिकट प्रसंग पुष्कळशा अंशाने टळला असता. पण सरकारला ही गोष्ट सुचली नाही. हिंदूप्रांतांतून हवे तेवढे सैनिक-सामर्थ्य निर्माण होण्याची शक्यता असूनहि, तिचा फायदा घेण्यांत आला नाही. अहिंसेच्या शांतिब्रह्मांनी या बाबतीत सरकारची व लोकांची झोपमोड केली नाही. अशी झोपमोड करणारी जी काही थोडीशी माणसें देशांत होती त्यांना सार्वजनिक जीवनांतून उठविण्यांतच पुरुषार्थ आहे, असे कित्येकांकडून मानण्यांत आले. आणि त्यामुळे आज हिंदुस्थानांतील हिदंवर आणि त्या असहाय हिंदूंचे संरक्षक व 'ट्रस्टी' जे ब्रिटिश लोक त्यांच्यावर बिनतोड प्रसंग आलेला आहे ! PE R IENT ....