पान:पाकिस्तानचे संकट.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ पाकिस्तानचे संकट in " असल्याने हा दुबळेपणा नाहीसा होणें हें 'रिफॉर्स अॅक्टा'च्या "दुरुस्तीपेक्षांहि महत्त्वाचे आहे"* असें मत पंडितजींनी निर्भीड-.. - पणाने मांडले. अशा धोरणी दृष्टीची माणसें गांधीयुगाच्या शांतता-साम्राज्यांत गुदमरून गेली नसती तर, राष्ट्ररक्षणाचा प्रश्न हिंदूंच्या दृष्टीने आजच्यासारखाच बिकट राहिला असता की काय, हा प्रश्न मोठा विचारार्ह आहे. , . डॉ० आंबेडकर यांनी हिंदुस्थानच्या संरक्षणाबद्दल लिहितांना जी माहिती वाचकांपुढे मांडली आहे ती फार बहमोल आहे. लष्करी बाबतींत हिंदूंना सतत अन्याय कसा होत आलेला आहे हा बोध त्या माहितीपासून घेऊन हिंदुसमाज यापुढे वागेल तर ही माहिती मिळवून हिदंपुढे मांडण्याचा डॉ० आंबेडकरांचा उद्योग सफल ठरल्यासारखा होईल. या माहितीवरून डॉ. आंबेडकरांनी काढलेले सिद्धांत मात्र मोठे वादग्रस्त आहेत. हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या प्रश्नाला यापुढे कोणती दिशा लागेल याविषयींचे कोणतेंहि अनुमान सध्यांच काढणे हे पत्त्यांचे बंगले बांधण्यासारखें निष्फल ठरण्याचाहि संभव आहे. चालू युद्धाच्या समाप्तीच्या वेळी जगाची स्थिति काय राहील, युरोपांतील प्रबळ राष्ट्रांची तौलनिक शक्ति काय ठरेल, आशिया खंडांतील रशिया जर्मनीने धुळीस मिळविला आहे त्याचे आशियाच्या भवितव्यावर काय परिणाम होतील, जपानचे सामर्थ्य हटेल की वाढेल, आपल्या साम्राज्याचा , 'गेली पांच वर्षे' पृष्ठ ६११, न. चिं. केळकर. दि इंडियन प्रोग्रेसिव्ह इन्शुअरन्स कंपनी लिमिटेड, पुणे शहर. या कंपनीची एजन्सी व विमा पॉलिसी निश्चित फायदेशीर आहे. माहिती मागवा.