पान:पाकिस्तानचे संकट.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट is allowed to bear any loyalty to them and is called upon to do everything in his power, by policy or force or fraud, to convert the non-Moslems there to Moslema faith to bring about its political conquest by a Moslem power. * (मुसलमानांची धार्मिक मते व त्या मतांनी रंजित झालेले त्यांचे राजकारण यांचा विचार केला तर त्यांच्या दृष्टीला मानवी जगाचे फक्त दोनच भाग पडलेले दिसतातः इस्लामव्याप्त-भूमि व शत्रु-भूमि ! जेथें सर्वस्वी मुसलमानांची वस्ती आहे अगर जेथें राजसत्ता मुस्लीम आहे ती इस्लाम-व्याप्त भूमि असून ज्या भू-भागांतील लोकवस्ती प्राय: मुसलमानेतरांची आहे अगर जेथील राजसत्ता मुसलमानेतरांच्या हाती आहे ती शत्रु-भूमि होय.. खऱ्या मुसलमानाने अशा भूमीत देशनिष्ठेनें राहणे हे अधर्म्य आहे. कारस्थाने करून, दंडेली करून, लवाडी करून अगर साधेल त्या त्या अन्य उपायांचा अवलंब करून तेथील मुसलमानेतरांना मुसलमान करणे आणि ही शत्रु-भूमि मुसलमानी सत्तेच्या वर्चस्वाखाली आणणे हा त्यांचा धर्म होय, असा आदेश त्यांना देण्यात आलेला आहे.) सीमा-प्रांत, पंजाब, सिंध, बलुचिस्थान, बंगाल या प्रांतांत मुसलमान हे लोकसंख्येने अधिक असल्यामुळे त्या प्रांतांचा स्वतंत्र सुभा करण्यात यावा; साऱ्या भारताची मध्यवर्ती राजकीय सत्ता एकमुखी असली तर, त्यांत हिंदूंचे संख्याधिक्य टाळतां येण्यासारखे नसल्यामुळे त्या संख्याधिक्याखालीं नांदण्याला आम्ही मुसलमान तयार नाहीं; काश्मीर संस्थानांत प्रजा बहुसंख्य मुसलमान म्हणून तें संस्थान पाकिस्तानमध्ये सामील व्हावें व तेथें लोकसत्ताक म्हणजेच इस्लामी राज्यपद्धति सुरू करावी; भोपाळ, दक्षिण हैद्राबाद या संस्थानांतील प्रजा प्रायः हिंदु असली तरी तेथे मात्र राजसत्ता पूर्णतया बेजबाबदारपणेच नांदावी–या सकृद्दर्शनी परस्परविसंगत दिसणाऱ्या मुसलमानांच्या मागण्यांचा अन्वयार्थ नीट लावावयाचा तर त्यांच्या वृत्तींत भिनलेल्या या विचारसरणीपर्यंत जाऊन भिडल्याशिवाय गत्यंतर नाहीं ! रोग्याच्या अंगांत रोग

  • The Presidential Address, p. 33.