पान:पाकिस्तानचे संकट.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६५ आंबेडकरांना काही सवाल ज्या फेडरेशनची रूपरेषा आंखलेली आहे त्या फेडरेशनमध्ये या प्रश्नाचं काय उत्तर देण्यांत आलेलें आहे या विषयाची चर्चाहि डॉ०आंबेडकरांनी आपल्या व्याख्यानांत केलेली आहे (पृ० ४२-४३). संस्थानिक फेडरेशनमध्ये सामील झाले तर त्यांना त्यांतून फुटून निघण्याची सत्ता देण्यात आलेली आहे; पण, फेडरेशनमध्ये सामील होणान्या अकरा प्रांतांना मात्र ही सत्ता नाहीं असें डॉ० आंबेडकरांनी म्हटलेले आहे. पार्लमेंटनें १९३५चा सबंध कायदाच उखड़न टाकला आणि सगळीच सृष्टि नव्याने उभारण्याचा घाट घातला तर काय घडेल ही सुलतानी आपत्ति सोडली तर, प्रांतांना फेडरेशनमधून स्वेच्छेनें फुटन बाहेर निघण्याची सोय या कायद्यांत नाहीं! सध्या फक्त सिध, पंजाब, बंगाल प्रभृति प्रांतांत लोकसत्ता नांदत असल्यामुळे आणि हिंदुस्थानच्या बहुसंख्य प्रांतांतून लोकसत्तेचा लोप झालेला असल्यामुळे, पुष्कळांना असा भास होतो की, फेडरेशन सध्या अस्तित्वातच नाही! ही कल्पना साफ चुकीची आहे. सात प्रांतांत मंत्रिमंडळ नसली, त्या प्रांतांचा कारभार गव्हर्नर आपल्या एकट्याच्या हुकमतीखाली चालवीत असले तरी, ते प्रांत ब्रिटिश इंडियन फेडरेशनचे घटक आहेत, फेडरेशनसाठी अवश्य असणारी फेडरल कोर्ट वगैरे सामग्री निर्माण झालेली असून ती सध्यांहि विद्यमान आहे, कायदेकानू करण्याबाबत प्रांतिक सत्ता व मध्यवर्ति सत्ता यांच्या दरम्यान क्षेत्रविभागणी कशी व्हावी याचे १९३५च्या कायद्यांत सांगितलेले तंत्र सुरूच आहे आणि त्यामुळे, फेडरेशन अजिबात अस्तित्वातच नाही हा रूढ असलेला समज सर्वस्वी निराधार आहे. | Federations. Freedom या पुस्तकाच्या पृष्ठ १३० वर डॉ. आंबेडकर यांनी पुढील वाक्य लिहिले आहे : British Indians should first ask for a federation and responsibility confined to British India. (ब्रिटिश हहींतील हिंदुस्थानने म्हणजेच अकरा प्रांतांनी प्रथम आपल्यापुरतें फेडरेशन मागावे आणि या ब्रिटिश प्रांतांच्या फेडरेशनला मध्यवर्ति कारभारांत जबाबदारी मिळावी, अशी मागणी त्यांनी करावी). सदर पुस्तकाच्या पुष्ठ १४१ वर डॉ. आंबेडकरांनी पुढील वाक्य लिहिले आहे । They have a federation of their own and they have a right to demand responsibility for their federation.