पान:पाकिस्तानचे संकट.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० पाकिस्तानचे संकट संख्याबलाच्या जाणिवेमुळे हिंदू यापूर्वी कधीहि आक्रमक वनले नाहीत, स्वभावानेच ते तसे बनूं शकत नाहीत, आणि या म्हणूनच, हिंदूंवर आक्रमकपणाचा आळ कोणी घेतला तर तो ME साफ अमान्य केला पाहिजे ! . कांहीं एका मर्यादित स्वरूपांत पाकिस्तान मान्य करण्याला आज तयार झालेल्या डॉ. आंबेडकरांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारणे अवश्य आहे. Thoughts on Pakistan या पुस्तकांत डॉ. आंबेडकर यांनी फक्त ब्रिटिश अंमलाखाली असणाऱ्या हिंदुस्थानचाच विचार केलेला आहे. हिंदी संस्थानांसह फेडरेशन मान्य करण्यांत स्वातंत्र्यसिद्धीच्या दृष्टीने कोणता धोका आहे, हे डॉ. आंबेडकर यांना चांगले माहीत आहे. आणि म्हणूनच, संस्थानांच्या भानगडीत अजिबात न पडतां, ब्रिटिश हिंदुस्थानांतील लोकांनी आपला प्रश्न आपल्यापुरत स्वतंत्रपणे सोडवावा अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मुसलमानांनी पाकिस्तानच्या ज्या निरनिराळ्या योजना मांडल्या आहेत त्यांत संस्थानांचाहि समावेश झालेला आहे. मुसलमानांच्या कल्पनांमध्ये तरंगत असलेले पाकिस्तान व डॉ. आंबेडकर यांनी मान्य केलेलें मर्यादित पाकिस्तान यांत हा जसा एक महत्त्वाचा फरक आहे, तसाच आणखीहि एक महत्त्वाचा भेद त्यांत असल्याचे स्पष्ट होत आहे. पंजान व बंगाल हे दोन्ही प्रांत शक्य तितक्या अधिक प्रमाणांत पचनी पाडावे असा मुसलमानांनी मांडलेल्या योजनांचा रोख आहे. या दोन प्रांतांतील जेवढा मुलुख नाइलाजाने सोडावा लागेल तेवढाच मुसलमानांसाठी सोडावा, अशी डॉ. आंबेडकर यांची योजना आहे. त्यामुळे, पंजाबमधील कांग्रा, अंबाला, कर्नाळ, रोहटक, गुरगाव, हिसार, फिरोजपूर, लुधियाना, जालंदर, अमृतसर, गुरुदासपूर व होशियारपूर इतके जिल्हे त्यांनी हिंदुस्थानांत सामील केल असून, बंगालमधील जेसोर, नडिया, पबना, राजशाही, बोग्रा, मैमनसिंग, डाक्का, टिपेरा, नौखाली, फरीदपूर, बकरगंज, चितगांग व चितगांग हिल्स एवढे जिल्हे व आसाममधील सिल्हेट जिल्हा एवढाच भाग मुसलमानांच्या पूर्वेकडील स्वतंत्र राज्यांत समाविष्ट होऊ देण्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. हे सर्व भाग, त्याचप्रमाणे सिंध, सरहद्दप्रांत, बलुचिस्थान इत्यादि