पान:पाकिस्तानचे संकट.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आंबेडकरांना काही सवाल १५९ कारण नाही. येवढे मात्र निश्चित खरें कीं, बुद्धीच्या अशा ठेवणींतून निर्माण झालेल्या धर्माचा अभिमानी व अनुयायी असा जो हिंदुसमाज तो आक्रमक असूच शकत नाही. तो आक्रमक नाही हेच तर त्या समाजाचे सद्यःकाली दुर्भाग्य ठरत आहे. या सर्व परंपरा विसरून, डॉ. आंबेडकर यांनी हिंदुसमाज आक्रमक वृत्तीचा आहे या विधानाचा पुरस्कार नसला तरी उच्चार तरी कां करावा, हे समजत नाही! श शाचा :: . आपल्या भोंवतालचा हिंदुसमाज संख्याश्रेष्ठ असला तरी, संख्याबलाचा दुरुपयोग करून तो आपला छळ करणार नाही हे मुसलमानहि मनांत ओळखतात, हे डॉ. आंबेडकरांनाहि माहीत आहे. ज्या प्रांतांत हिंदु निर्विवाद बहुसंख्येत आहेत त्या प्रांतांत कायद्यानेच निर्माण होणारे हिंदूंचे बहुमत मान्य करून, . मुसलमान स्वतंत्र मतदारसंघांची मागणी कां करतात या प्रश्नाचे विवेचन. डॉ. आंबेडकरांनी आपल्या ग्रंथांत (पृ० १००-१०१ वर) केले आहे. कामगार हिंदूंमध्ये जातिविषयक व वर्णविषयक भेद असून ते भेद खोलवर रुतलेले आहेत हे जाणणाऱ्या मुसलमानांना अशी खात्री वाटते की,हिंदु आपलें संख्याबल मुसलमानांविरुद्ध कधीहि वापरूं शकणार नाहीत. या या खात्रीमुळे मुसलमानवर्ग हिंदु बहुसंख्य प्रांतांत निर्धास्तपणे नांदूं शकतो, हे जाणणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी हिंदूंच्या संख्याधिक्याला आक्रमक हे विशेषण लावण्याला स्वतः कां प्रवृत्त व्हावें अगर इतर कोणी तसें विशेषण लावले तर त्यांनी तें सहन कां करावें, हे नीटसें समजत नाही. हिंदूंच्या धार्मिक शिकवणीचा व समाजरचनेचा भलाबुरा परिणाम असाच झालेला आहे की, मुसलमानांनी अगर इतर कोणत्याहि धर्माच्या लोकांनी त्यांच्या संख्याबलाला काडीमात्र भिण्याचे कारण नाही. संख्याधिक्यापासून कोणी भयच बाळगावयाचे असेल तर तें अहिंदूंनी बाळगावयाचे नसून, हिंदूंनीच बाळगावयाचें आहे. हिंदु व अहिंदु यांच्या दरम्यान तडजोड घडावयाचीच असेल तर शुद्ध न्यायाच्या व ऐतिहासिक पुराव्याच्या आधाराने ती कशी घडू शकेल. या प्रश्नाचे विवेचन केव्हां तरी होणे अवश्य आहे.