पान:पाकिस्तानचे संकट.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तान : शब्द व कल्पना काढीतच असतात. आणि सर महंमद इकबल यांच्या 'हिंदोस्तान हमारा' या पद्याचा अर्थ जाणणारे लोक असेंच म्हणतात की, हिंदुस्थान हा इस्लामी जगाचा भाग असल्याचंच या कविमहाशयांनी या गीतांत म्हटले आहे. मुसलमानांनी अन्यधर्मीयांच्या सत्तेखालीं नांदं नो-मूर्तिपूजक हिंदूंच्या सत्तेखाली तर नांदूच नये-तसा प्रसंग आला तर सत्ताक्रांति करून मुसलमानी सत्ता स्थापावी; नाही तर स्थानांतर करावे, अशी शिकवण मुसलमानांना परंपरेने मिळत आलेली आहे. ही शिकवण आणि तिच्या मागील वृत्ति या गोष्टी किती जुन्या असतील हे सुलतान अल्लाउद्दीनला त्याच्या समकालीन अशा एका काझीने दिलेल्या उत्तरावरून स्पष्ट होण्यासारखे आहे : To keep the Hindus in abasement is especially a religious duty, because they are the most inveterate enemies of the Prophet and because the Prophet has commanded us to slay them, plunder them and make them captive.* ___(हिंदु हे पैगंबर महंमदाचे अत्यंत कट्टे शत्रु असल्यामुळे त्यांना अवमानित अवस्थेत ठेवणे हे मुसलमानांचे विशेष धार्मिक कर्तव्य होय. हिंदूंना जिवानिशीं मारा, त्यांना लुटा व त्यांना बंदिवान करा असा आदेश पैगंबराने आम्हांला दिलेला आहे). अलीकडे तर या आशयाची शिकवण अधिकच बळावली आहे. मुसलभानांच्या मनांत मुरलेल्या या विचारपरंपरेचे स्पष्टीकरण बॅ० सावरकर यांनी १९३८ साली नागपूर येथे झालेल्या अ०भा०हिंदुमहासभेच्या अध्यक्षीय भाषणांत केलेले आहे. ते म्हणतात : Their theology and theocratical politics divide the human world into two groups only : the Moslem-land and the Enemy-land. All lands which are either entirely inhabited by the Moslems or are ruled over by the Moslems are Moslem-lands. All lands which are mostly inhabited by non-Moslems or are ruled over by a NonMoslem power are enemy-lands; and no faithful Moslem

  • Thoughts on Pakistan, p. 57.