Jump to content

पान:पाकिस्तानचे संकट.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विराष्ट्रवादाचे खंडन १५३ धर्मनिरपेक्ष दृष्टीने सहकार्य करावें, हेच श्रेयस्कर ! तसे करण्याची त्यांची इच्छा नसेल तर लोकसंख्येच्या कांटेकोर न्यायाने त्यांना जे मिळेल तेवढ्यावरच त्यांना समाधान मानावे लागेल. द्विराष्ट्रवाद अस्तित्वात आहे, हिंदुस्थानांत हिंदु व मुसलमान ही दोन भिन्न व विरोधी राष्ट्र आहेत असे गृहीत धरून, पाकिस्तान अपरिहार्य असल्याची कल्पना डॉ. आंबेडकर यांनी मांडली आहे. त्यांचे हे गृहीत कृत्यच तर्कशुद्ध नसल्यामुळे त्यांचे या मुद्यासंबंधीचे बरेचसे विवेचन अग्राह्य वाटतें! पण त्यांच्या ग्रंथांत इतर काही भाग विचारार्हहि आहे. सर्वस्वी प्रामाणिकपणा, सचोटी, सरळ व्यवहार. द. ना. हेजीब, पुणे किराणा व सुका मेवा यांचे व्यापारी __ स्थापना : सन १९२२ आमचेकडील सुका मेवा व निवडक किराणा माल वापरून आपली खात्री करा. पत्ता-२०, शुक्रवार पेठ, पुणे शहर.