पान:पाकिस्तानचे संकट.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ पाकिस्तानचे संकट समाजाच्या शāनी इतिहास लिहिले; त्यामुळे बुद्धधर्माच्या उदयापासून सत्यशोधक-समाजाच्या स्थापनेपर्यंत ज्या चळवळी झाल्या त्या विकृत रूपांत मांडल्या गेल्या. या सर्व चळवळी बंडखोर आहेत; पण, ऐक्यविघातक नाहींत. जुन्या पद्धतीनेच धंदा चालवावा असे म्हणणारे वडील व धंद्यांत नवा जोम आणणारे चिरंजीव यांच्यात होणाऱ्या लढ्यासारखा लढा हिंदुधर्म व हे पंथ यांच्यामध्ये झालेला आहे. व्यक्तीच्या शरीराच्या संगोपनाचाच न्याय येथेहि लागू पडतो. जुन्या काळच्या वैदिक लोकांपासून आजच्या सनातनी मंडळींपर्यंतचे लोक समाजघटनेच्या संग्राहक स्वरूपामुळे समाजाचे वैशिष्ट्य लोपू नये यासाठी झटत आले आहेत; तर, बौद्ध जैन, महानुभाव, शीख, आर्यसमाजी,सत्यसमाजी,ब्रह्मो इत्यादि सर्व पंथांतील लोक वैशिष्ट्यरक्षणानेच भागत नाही, विकासक्षमतेकडेहि लक्ष पुरवावे लागते असे म्हणत आलेले आहेत. हिंदुभूरूपी विनतेच्या पोटी जन्मलेल्या हिंदुसमाजरूपी गरुडाचे दोन प्रबळ पंख म्हणजेच परस्परांवर फडफडणाऱ्या या दोन विचारपद्धति ! - हिंदुस्थानांत राष्ट्र या पदवीला योग्य असणारा समाज हिंदु समाजच आहे हे या विवेचनावरून सिद्ध होत असल्यामुळे, आतां एकच प्रश्न शिल्लक उरतो. हिंदुस्थान या अखंड देशांत हिंदु हेच राष्ट्र म्हणून नांदणार व का त्यांच्या संस्कृतीचा ठेवा ज्या संस्कृत व तत्सदृश भाषांत आहे त्या भाषांचाच तेथे पुरस्कार होणार, हे उघडच आहे. पण, याचा अर्थ इतरांना येथें कांहींच अधिकार नाहीत, असा मात्र नव्हे. प्रांतांच्या योग्य मांडणीचे स्थूल स्वरूप वर एकदां सूचित करण्यांत आलेलें आहे. तसे प्रांत पडले तर बहुतेक प्रांतांतून हिंदु राष्ट्राचे प्रांतिक अवयवच बहुसंख्य म्हणून नांदतील. एखाद्या प्रांतांत त्यांना अल्पसंख्य म्हणून राहावें लागले तरी, या हिंदुराष्ट्राचा अवयव म्हणून ते तेथें राहतील; पण, अखिल भारताच्या व्यवस्थेमध्ये राष्ट्र म्हणून मान व अधिकार हिंदूंचाच राहील. अहिंदूंना न्यायतः व प्रमाणतः जे हक्क मिळावयाचे तेवढे त्यांना अवश्य मिळतील; पण, हिंदूंना कमीपणा येईल अगर अन्याय होईल असे कोणतेहि अधिकार अहिंदूंना मिळणार नाहीत. अहिंदूंना अवश्य असणारें धार्मिक संरक्षण प्रांतिक क्षेत्रांतच मर्यादित झालेले असल्यामुळे, वस्तुत: अहिंदूंनीं मध्यवर्ति कारभारांत व व्यवस्थेत हिंदूंबरोबर नागरिकत्वाच्या समान भूमिकेवर