पान:पाकिस्तानचे संकट.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ९वें र आंबेडकर व पाकिस्तान डॉ. आंबेडकरांना काही सवाल हिंदुस्थानांतले हिंदु व मुसलमान यांचें व इतर भारतीयांचे मिळून एक राष्ट्र हिंदुस्थानांत नांदत नसून हिंदुराष्ट्र व मुसलमानी राष्ट्र अशी दोन भिन्न राष्ट्र या देशांत नांदत आहेत ही गोष्ट गृहीत धरून अगर मान्य करून, डॉ०आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथांत पाकिस्तान या विषयाचा विचार केलेला आहे. ही गृहीत गोष्टच बरोबर नाही. या देशांत नांदणारे सर्व धर्मपंथ व जातिजमाति यांचे मिळून एकराष्ट्र सिद्ध होण्याची शक्यता मुसलमानांच्या वृत्तीमुळे नाहींशी झालेली असल्यामुळे, या देशांत हिंदुराष्ट्र हे एकच राष्ट्र शिल्लक उरतें. इतर धर्मांचे व पंथांचे लोक या देशांत अल्पसंख्य वर्ग म्हणून राहूं व नांदूं शकतात. हेच मत बरोबर असल्यामुळे, डॉ० अ बेडकर यांच्या सगळ्या इमारतीचा पायाच उखडल्यासारखा होतो. अशा स्थितीत, डॉ. आंबेडकर यांनी उपस्थित केलेले इतर मुद्दे विचारांत घेण्याचेंहि कारण नाही, असे कोणी म्हटले तर तेंहि बरोबर ठरेल; पण, डॉ. आंबेडकर यांची विद्वत्ता, त्यांचा राजकारणांतील दर्जा आणि विचाराची देवाण-घेवाण करून मत बनविण्याची आणि बदलण्याची त्यांची वृत्ति या सर्व गोष्टींचा विचार केला म्हणजे वरील गृहीत कृत्य अमान्य करूनहि, कांहीं मुद्यांचा विचार करणे श्रेयस्कर ठरते. डॉ. आंबेडकर यांनाहि एक महत्त्वाची गोष्ट मान्य आहे. हिंदुस्थानात निर्माण होणारी मध्यवर्ति सत्ता खंबीर असली पाहिजे असे त्यांचेंहि मत असल्याचे दिसते. मुसलमानांना अनुकूल अशी सध्यांची प्रांतरचना व सध्यांची मुसलमानांची वृत्ति या गोष्टी कायम आहेत तोवर या देशांत खंबीर मध्यवर्ति सरकार नांदू शकणार नाही-तें नांदण्याची सोय व्हावी म्हणून हिंदु व मुसलमान विभागांची सोईस्कर विभागणी करण्यात यावी, असे डॉ. आंबेडकर यांचे म्हणणे आहे. या म्हणण्याचा विचार नीट, दूरदर्शीपणाने करतांना