पान:पाकिस्तानचे संकट.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

' द्विराष्ट्रवादाचे खंडन १५१ मेळाव्यांनी केलेल्या कार्याचे या दृष्टीने महत्त्व किती आहे याची नेमकी कल्पना लोकांना अद्याप यावयाची आहे. . लहानपणीच साऱ्या हिंदुस्थानभर हिंडून, मुसलमानी अंमलामुळे तीर्थक्षेत्रांची झालेली दीनवाणी स्थिति पाहून, रामदासांनी आपले मठ व महंत यांच्या संस्थापनेने सारा हिंदुस्थान कसा संघटित केला असेल याची कल्पना त्या मठांचे आजचे निःसत्त्व अवशेष पाहूनहि होऊ शकते. भागवत धर्मांतील कवींनी महाराष्ट्रांत ज्या वैष्णव संप्रदायाचा फैलाव केला त्याच्या विचारांशी अगदी सदृश असे विचार तत्कालीन तामीळ संत व तामीळ आचार्य यांच्या वाङमयांत व्यक्त झालेले आहेत ही गोष्ट कै० ल० रा० पांगारकर यांनी 'मराठी वाङमयाचा इतिहास' या ग्रंथाच्या पहिल्या खंडांत स्पष्ट केली आहे. अशा प्रकारची वैचारिक व सांस्कृतिक साम्ये वाढत्या प्रमाणावर निर्माण करण्याला अवश्य असणारे विश्वासू व टिकाऊ मनुष्यबळ पुरे पडले नाही, सुरू झालेला 'मिशनरी' प्रयत्न पुरा व प्रभावशाली करण्याइतकी संघटना होऊ शकली नाहीं अगर टिकू शकली नाही, या गोष्टी कबूल करावयाला हरकत नाहीत. पण सर्व हिंदुसमाजाला एका सूत्रांत गुंफून त्याला डोळस व कार्यक्षम बनविण्याची प्रक्रिया पूर्वी अनेकवार घडलेली आहे आणि यांतच हिंदुसमाजाचे राष्ट्रीयत्व सांठलेले आहे. वैचारिक व सांस्कृतिक ऐक्याची जोपासना अशा प्रकारे होत होती तर रामचंद्र युधिष्ठिरापासूनचे हिंदुसम्राट् देशांत राजकीय ऐक्य निर्माण करण्यासाठी झटत होते. अशोक, हर्षवर्धन, समुद्रगुप्त प्रभृति हिंदु सम्राटांनी या राजकीय ऐक्याची जोपासना केली आणि या राजकीय ऐक्याच्या प्रस्थापनेसाठींच मराठ्यांनी हिंदुस्थानभर संचार केला. सर्वांगीण ऐक्य निर्माण करण्याची ही प्रक्रिया पुनरुज्जीवित करून तिला अद्ययावत् स्वरूप देणे हेच हिंदुसंघटनेचे उद्दिष्ट आहे. हिंदू समाजांत ऐक्य-भावना वाढत आहे आणि एकराष्ट्रीयत्वाची जाणीव बळावत आहे ही गोष्ट डॉ० आंबेडकरहि कबूल करीत आहेत. या कार्याला अधिकाधिक चेतना आणणे आणि ही चेतना विफल ठरूं नये म्हणून इतर आक्रमकांच्या दटावणीला निर्भयपणानें तोंड देणे हेच पाकिस्तानचा प्रतिकार करण्याचे साधन आहे, असें हिंदुमहासभेच्या शिकवणीचे सार आहे. इतिहासलेखन हिंदुसमाजाच्या विघटनेला पोषक कसे होईल ही दृष्टि ठेवून हिंदु