पान:पाकिस्तानचे संकट.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट मुळी लोकविलक्षण स्वरूपाचा असतो. 'इस्लामी जग' (दार-उल-इस्लाम) व 'तद् बाह्य जग' (दार-उल्-हरब) असे जगाचे दोनच विभाग कल्पून, इस्लामी जगाबाहेर असलेल्या जगाविषयींची आपली कर्तव्ये मुसलमान समाज ठरवीत असतो. 'कृण्वतो विश्वमार्यम्' या उदात्त ध्येयाने प्रेरित झालेल्या आर्यांनी सहिष्णुतेने वागून आपल्या विचारांचा प्रचार केला. इस्लामचे अभिमानी अशा सहिष्णुतेने वागून जगभर आपला पंथप्रचार करीत नाहीत. फार प्राचीन काळी इस्लाममध्ये ही सहिष्णुवृत्ति नांदत होती असें भाई मानवेन्द्र नाथ रॉय यांचे म्हणणे आहे. तें मान्य केले तरी, इस्लामच्या धडका भारताला बसू लागल्या त्या वेळी ही सहिष्णुता नष्ट झाली होती हे सत्य असून, इस्लामची वकिली करणाऱ्या भाई रॉय यांनाहि ते मान्य करावे लागले आहे. Islam came to India after it had played out its progressive role and its leadership had been wrested from the learned and cultured Arabs.* (इस्लामची प्रागतिक प्रवृत्ति संपुष्टात आल्यानंतर आणि विद्वान् व सुसंस्कृत अरबांकडे असलेलें इस्लामचे नेतृत्व त्यांच्याकडून हिसकून घेतले गेल्यानंतर, इस्लाम भरतखंडांत आला.), ही भाई रॉय यांचीच कबुली आहे. भारतांतील मुसलमानांची हिंदंकडे पाहण्याची दृष्टि किती असहिष्णुपणाची आहे हे स्पष्टपणे पटवून देणारा एक प्रसंग डॉ० आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकांत हुतात्मा स्वामी श्रद्धानंदजींच्या उद्गारांच्या आधारें वर्णिला आहे. मोपल्यांनी मलबारमधील हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार केले त्यांचा निषेध करण्याचा प्रश्न काँग्रेसच्या विषय नियामक समितीत निघाला असतां, 'राष्ट्रीय ' वृत्तीचे मौलाना हजरत मोहानी यांनी मोपल्यांच्या रक्तपिपासु वृत्तीचे समर्थन केले व असें चक्क सांगितले की, मलबार हा इस्लामी जगाचा भाग असूनहि, तेथील हिंदूंनी ब्रिटिशांशी संगनमत केल्यामुळे 'हिंदुधर्म सोडून इस्लाम स्वीकारा; नाही तर आमच्या तलवारींना बळी पडा' असें हिंदूंना सांगण्यांत मोपल्यांनी गैर असें कांहीं केलें नाहीं. हिंदुस्थान हा इस्लामी जगाचा एक भाग आहे हे उद्गार लीगवाले मुसलमान वारंवार

  • The Historical Role of Islam, p. 95. 1 Thoughts on Pakistan, pp. 155-156.