पान:पाकिस्तानचे संकट.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० पाकिस्तानचे संकट मानांच्या विरुद्ध दाखविली जाई तशीच ख्रिस्त्यांविरुद्धहि दाखविली जाई हे वसईच्या संग्रामाच्या हकीकतीवरून कळण्यासारखे आहे. एरवीं, मुसलमानांच्यासुद्धा इभ्रतीला उगीच दुखवू-डिवचूं नये अशीच सर्वसामान्य वृत्ति असे हे शाहू महाराज, सुरजमल जाट, मल्हारराव होळकर यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. हिंदु-मुसलमानांच्या झगड्यांना आलेले अवास्तव महत्त्व अलीकडचें आहे व त्याची कारणे प्राकृतिक अगर स्वाभाविक नसून राजकीय आहेत, आपल्या नव्या अवताराला अनुरूप अशी अभिमानस्थाने शोधून काढण्यांत कांहीं मुसलमान आपल्या बुद्धीचा व्यय करीत असतात. हिंदूंपासून आपण सर्वस्वी भिन्न आहोत असे दाखविण्यासाठी मुसलमानांनी जसें ऊर्दूचे सोंग उठल्याबसल्या नाचविण्याला सुरुवात केली आहे अगर 'फैझ' टोपीची नवी टूम काढिली आहे त्याप्रमाणेच आणखी काही प्रचारात्मक गोष्टी त्यांनी मोठ्या हिरीरीने सुरू केल्या आहेत. प्रत्येक प्रांतांतले पुष्कळसे मुसलमान मूळचे हिंदुवंशांतले असल्याकारणाने व त्यांच्या घराण्यांत इस्लाम-स्वीकार नेणतेपणाने केला गेला असल्यामुळे, त्यांच्यामध्ये हजारों चालीरीति व प्रचार-प्रघात मूळचे म्हणजे हिंदूंचेच रेंगाळत राहिले आहेत. कायद्याच्या कक्षेतहि हा प्रकार शिल्लक आहे. काही विशिष्ट बाबतींत मुसलमानांना त्यांचा इस्लामी कायदा लावावा अशी मुभा आहे; पण, या बाबतींत व्यावहारिक अनुभव असा येतो की, कांहीं मुसलमानांनी मूळच्या हिंदुकायद्याप्रमाणे व्यवहार चालू ठेविले आहेत ! या मुसलमानांना आपल्या मूळच्या हिंदुपणाची इतकीहि आठवण राहूं नये यासाठी मुसलमानांनी अलीकडे असे उद्योग केले की, त्यांमुळे सर्व मुसलमानांना सर्व बाबतींत मुसलमानी कायदाच लागू व्हावा ! इस्लाम धर्माची नालस्ती करणाराचा वध धर्म्यच होय अशी इस्लामी शिकवण असल्यामुळे, पाकिस्तान सिद्ध झाल्यावर, पाकिस्तानांत अशा प्रकरणांतल्या खुनी इसमांना तेथील सरकार फांशी देईल की अशा इसमांना तें सरकार पारितोषिक देईल, हा प्रश्न मनोरंजक म्हणून मनांत "घोळविण्यासारखा आहे! मुसलमानांतल्या हिंदुपणाच्या अवशिष्ट खाणाखुणा नष्ट करण्याच्या उद्योगाबरोबरच आणखीहि एक उद्योग सुरू झाला. हिंदूंचे अभिमानविषय