पान:पाकिस्तानचे संकट.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- द्विराष्ट्रवादाचे खंडन असूनहि, मुंबई, मद्रास, संयुक्तप्रांत येथें पब्लिक वर्क्स हे भुसभुशीत खाते मुसलमान दिवाणांच्या हाती देण्यात आले. मुसलमानी प्रांतांत नाइलाज म्हणन हिंदु अर्थसचिव नेमण्यांत आले. मुसलमानी राज्यांसाठी प्राण पणाला लावून लढणारे शहाजीसारखे रणशूर, खुद्द औरंगजेबाच्या वतीने स्वारीशिकारीवर जाणारे रजपूत योद्धे, दक्षिणेतल्या शाह्यांचे निर्मूलन करूं पाहणारे मोंगल सम्राट, यवनीशी विवाहबद्ध होणारा जगन्नाथपंडित, उपनिषदांचे फारशीत भाषांतर करणारा राजपुत्र दारा शुकोह, बाल शाहूवर मातृवत् प्रेम करणारी रोषनारा बेगम, अहंमदशहा अब्दालीच्या भुलावणीला वश न होतां पानिपतावर तोफखान्याचे विक्राळ युद्ध करून भाऊसाहेब पेशव्यांबरोबर धारातीर्थी देह ठेवणारा इब्राहिमखान गारदी, कोल्हापूरच्या कै० शाहू छत्रपतींनी गुणी म्हणून दरबारांत ठेवलेला गवई अल्लादियाखां इत्यादि नांवांतली हिंदु-मुसलमानांची गल्लत पाहिली म्हणजे, धर्मभेद असूनहि, हिंदु-मुसलमान समाज कित्येक शतकें कसा एकरूप बनत चालला होता याची कल्पना करतां येते ! हिंदु हे वृत्तीनेच क्षमाशील;* त्यामुळे त्यांनी इतरांवर केवळ धर्मभिन्नतेमुळे सहसा आक्रमण केले नाही. हिंदु म्हणून त्यांचा इतरधर्मीयांकडून छळ होऊ लागला व तो अगदी असह्यचं झाला म्हणजे तेहि आपली प्रतिकारवृत्ति दाखवीत; पण, ती जशी मुसल-.

  • Intolerance is not a defect of Hinduism. Mahomedan princes gladly confided to learned and astute Brahmins civil trusts of importance and many a Mussalman rose to honour and fortune in a Maharaja's camp. The ministers of Hyder Ali, who concealed for a time the event of his death, were Hindus of the highest caste; and when a Chancellor of the Exchequer was to be appointed at Morshidabad, the Nawab Nazim tried to have Nund Coomar appointed instead of Mahamad Rezakhan. Sunnis. Shias, Marhattas and Sikhs competed freely for distinction and profit in every city and camp of Hindustan. The tide of war ebbed and flowed, but mosque and temple stood unscathed where they had stood before-Empire in Asia by W. M. Torrens, M. P..