पान:पाकिस्तानचे संकट.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विराष्ट्रवादाचे खंडन व आमचे अभिमानविषय भिन्न आहेत हे दाखविण्याची जरुरी वाढू लागल्याबरोबर, मुसलमानांनी इतिहाससंशोधनाला सुरुवात केली! इतिहाससंशोधनामुळे अप्रिय गोष्टींच्या बुजलेल्या जखमांतून रक्त भळभळा वाहूं लागते अशा आशयाचा इषारा देणारे एक अवतरण डॉ. आंबेडकर यांनी (पृ० ३० वर) दिले आहे. त्या इषायाची महति विसरून, भारतीय मुसलमान आपले राष्ट्र-पुरुष कोण हें धुंडाळं लागले! आणि, या संशोधनांतून निष्पन्न काय झालें! १९२६ च्या जूनमध्ये सिंध खिलाफत कमिटीने अखिल भारतीय खिलाफत कमिटीकडे एक शिफारसवजा ठराव धाडून दिला! औरंगजेबाचा राज्यारोहणदिन व महंमद बिन कासिमच्या सिंधविजयाचा दिन हे दोन 'दिन' हिंदुस्थानभर साजरे केले जावे, अशी मागणी या कमिटीतल्या अडाणी माणसांनी केली! -इतिहास-संशोधनाच्या अशा आडरानांत शिरणाऱ्या पंडितांना डॉ०. आंबेडकरांसारख्या विचारनिष्ठ विद्वानाने अनेक प्रश्न विचारले पाहिजेत ! आपले पुरातन हक्क कोर्टातून प्रस्थापित करण्याचा प्रसंग आला तर आपले वंशवेल कोर्टापुढे येऊ नयेत अशी धडपड तुमच्यामधले लोक करतात की नाहीं हा पहिला प्रश्न डॉ० आंबेडकरांनी अशा लोकांना विचारला पाहिजे. चारदोन पिढ्यांपूर्वीचे आपले वंशज हिंदु होते, आपण मुसलमान आहों हा फरक जिव्हारी झोंबत असल्यामुळेच तुम्हांला या कामीं संकोच वाटतो ना, असा दुसरा प्रश्न डॉ० आंबेडकरांनी विचारला पाहिजे! चारदोन पिढ्यांपूर्वीचे तुमचे वंशज जर हिंदु होते तर महंमद बिन कासिम अगर औरंगजेब यांच्या काळी तुमच्या आजोबांच्या आजोबांचे आजोबा जिवंत असतील तेहि हिंदूंच असतील ना, असा सवाल डॉ. आंबेडकरांनी विचारण्यासारखा आहे. इतिहास-संशोधन करून राष्ट्र-पुरुष धुंडाळणाऱ्या मुसलमानांना डॉ० आंबेडकरांनी सांगावें की, भाईहो, संशोधनच करावयाचें । तर ते खोलवर व दूरवर तरी करा! प्रतापगड किल्ल्यावर अफझलखानाची कबर आहे. 'मरणान्तानि वैराणि' हे उदात्त तत्त्व कृतीने सिद्ध करणाऱ्या उदारधी श्री शिवरायांनी