पान:पाकिस्तानचे संकट.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ पाकिस्तानचे संकट in perfect peace and concord and a majority of the individuals belonging to them have even overcome their prejudices so far as to smoke from the same Hookah*. (हिंदु व मुसलमान यांच्यामध्ये धार्मिक स्वरूपाचे झगडे क्वचित् होतात. या दोन वर्गांमध्ये पूर्ण सलोखा व दिलजमाई नांदत आहे. दोन्ही जमातींतल्या बहुसंख्य वर्गाने आपले धार्मिक आग्रह इतके दाबून टाकले आहेत की, परस्परांमध्ये हुक्कापाण्याचा व्यवहार निःसंकोच मनाने होतो.) वरवर कितीहि राज्यक्रांत्या झाल्या तरी, महापुरांत तग धरणाऱ्या लव्हाळ्याप्रमाणे, चौफेर पसरलेल्या ग्रामसंस्था व पंचायती तग धरून होत्या व अज्ञानाने वा अनिच्छेनें मुसलमानी धर्मात गेलेल्या ग्रामस्थांना सांभाळून घेऊनच खेडुतांचे सगळे व्यापारव्यवहार चालत होते. संत-महंत, पीरफकीर, नाटक्ये-चेटक्य यांच्याबद्दलचे बरेवाईट भाव बहुधा सर्वांच्या ठिकाणी सारखेच असत. कारण, पुराणाची जागा कुराणाने घेतली तरी, मनाची मशागत प्रायः एकाच पद्धतीने होत असल्यामुळे व मुळची माती बहुधा एकाच खाणींतली असल्यामुळे, हर्षामर्षाच्या प्रसंगांत. व अभिमानविषयांत मोठासा, फरक होत नसे. लुटालूट करण्यासाठी परके मुसलमान येत ते बहुधा वळिवासारखे येत व जात. त्यांचा उपद्रव मनस्वी होई; पण, तो प्रासंगिक उपद्रव टळून गेला की, जीवनाची घडी फिरून सुरळित बसल्यासारखी होई व जीवनाच्या पुष्कळशा प्रांतांत हिंदु-मुसलमान हा भेद लोप पावे. मुसलमान राज्यकर्ते स्थायिक झाले व स्थायिकपणाने राज्य करूं लागले तेव्हां त्यांना पुष्कळशा बाबतीत मुसलमानपणा विसरूनच वागावें लागले. मुसलमान राज्यकर्ते असल्यामुळे, मुसलमानांत अमिरी व फकिरी यांच्यावरच अवलंबून राहण्याचा पोखं बळावला; हिंदु जिंकले गेले असले तरी त्यांच्यामधील राजकारणी परंपरी जागृतच असल्यामुळे, प्रांतोप्रांतीचे प्रमुख हिंदु सरकारचे सावकार, लष्करी व मुलकी अधिकारी इत्यादि पदांवर राहिले. काही बाबतींत मुसलमानांचे घोडे अजून कसें लंगडेंच आहे हे प्रांतिक स्वायत्तता सुरू झाल्यानंतर बनलेल्या मंत्रिमंडळांत झालेल्या खातेविभागणीवरून दिसून येते. हिंदुमंत्री उपलब्ध

  • Topography of Dacca by Dr. Taylor. sobe