पान:पाकिस्तानचे संकट.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तान : शब्द व कल्पना आपल्या या प्रिय, पूज्य व प्राचीन मायदेशाची खांडोळी करणे हा त्या शब्दामागील उद्देश आहे. असा हा दुष्ट उद्देश गर्भात धारण करणाऱ्या 'पाकिस्तान' शब्दामुळे हिंदूंची मनें अस्वस्थ व्हावी हे स्वाभाविकच आहे. विद्यमान स्थितीचा विचार केला तर, जगांतल्या मानव समाजांत नुसत्या हिंदुसमाजाचे प्रमाण जवळ जवळ एकषष्ठांश इतके आहे. या सर्व समाजाचे संगोपन व्हावयाचे, जगांतील पराक्रमी व प्रगमनशील मानव समाजाबरोबर या अफाट समाजांतल्या मागसलेल्यांना व दलितांनाहि आणावयाचे आणि ईश्वराने मानव समाजावर सोपविलेल्या उदात्त कर्तव्यांचे पालन व्हावे या हेतूनें या सुमारे तीस कोटी लोकांचा योगक्षेम चालावयाचा तर आजचा सर्व हिंदुस्थानदेखील त्या कार्याला पुरणार नाही. जगांतल्या एकषष्ठांश मानव समाजाला पृथ्वीवरील ३. भूभागाघर आपला निर्वाह स्वाभिमानानें व समाधानाने करतांच येणार नाही.* वास्तविक पहातां हिंदूंच्या सर्वांगीण योगक्षेमासाठी सध्यांच्या हिंदुस्थानच्या पांचपटीइतका तरी भूभाग मोकळा राहिला पाहिजे. तें दूरच राहून, सध्यांच्या हिंदुस्थानचाच एक तुकडा लांबविला जाण्याची कल्पना बोलली जात आहे ! हिंदूंना ही कल्पना असहाय वाटावी यांत आश्चर्य कांहींच नाही." असह्य वाटणारी ही कल्पना अशक्य ठरावी म्हणून हिंदूंनी एक गोष्ट सतत स्मरणांत धरली पाहिजे. मुसलमानांची पाकिस्तानची मागणी ही त्या जमातींत जो कल्पनाविषयक उद्धटपणा परंपरेने चालत आलेला आहे त्या उद्धटपणाच्या पोटी जन्मलेली आहे, हे हिंदूंनीं विसरू नये. जगाची वाटणी-विभागणी करतांना मुसलमान जो विचार करतात तोच ___*डॉ० केतकर : ज्ञानकोश, प्रस्तावना खंड : हिंदुस्थान आणि जग : पृ०४२. आधुनिक जगाच्या सध्यांपर्यंत परिचित झालेल्या भूपष्ठाचे क्षेत्रफळ पांच कोटी, वीस लक्ष चौरस मैल आहे......हिंदुस्थानचे क्षेत्रफळ सुमारे अठरा लक्ष चौरस मैल (१८,०८,६७९ चौरस मैल : Federation vs. Freedom, डॉ० आंबेडकर) म्हणजे जगाचा एकोणतिसावा हिस्सा आहे.