पान:पाकिस्तानचे संकट.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट असे म्हणतात की, हिंदुस्थान हीच ज्यांची पितृभू व पुण्यभू आहे अशा तीस कोटी हिंदू, हिंदुस्थानांत राष्ट्र आहे व या राष्ट्राचें सारें भवितव्य या देशाच्या स्वातंत्र्याशी व सुरक्षिततेशी निगडित झाले असल्यामुळे, तें राष्ट्र एकाकीहि स्वातंत्र्यार्थ झगडेल. इतर लोक येतील तर हिंदु त्यांच्या मदतीचा स्वीकार करून झगडतील; न येतील व स्वस्थ बसतील तर एकटे हिंदु झगडा चालवितील आणि विरोध करतील तर त्याहि विरोधाला तोंड देऊन हिंदु आपले ध्येय गांठतील; मदतीचा मोबदला म्हणून अहिंदूंनी अवास्तव असें कांही अपेक्षू अंगर मागू नये, ते त्यांना मिळणार नाहीं-हा या विचारसरणींतला आशय आहे. हिंदी मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र' आहेत असें बॅ० सावरकरांचें अगर हिंदुसभेचे मत आहे, असें अधिकृतरीत्या बाहेर आलेले नाही. . पण, बॅ० सावरकरांचे मत कांहींहि असले तरी डॉ. आंबेडकरांवर तें बंधनकारक नाहीं! या द्विराष्ट्रवादाची चर्चा करतांना त्यांनी पुष्कळ ग्रंथकारांची अवतरणे दिली आहेत (पृ० २५-३३). या अवतरणांच्या आधारें डॉ. आंबेडकरांच्या विवेचनाचा विचार केला तर असे दिसते की, वंश, भाषा, परंपरा, संस्कृति इत्यादि गोष्टींचा विचार केला तर हिंदूंचेंहि एक राष्ट्र ठरत नाही व मुसलमानांचेंहि एक राष्ट्र ठरत नाही. मुसलमान हे तर परवांपरवांपर्यंत स्वतःचे वर्णन जमात, समाज, अल्पसंख्य वर्ग वगैरे शब्दांनी करीत होते, या गोष्टीची जाणीव डॉ. आंबेडकरांनाहि आहे (५० ३१-३२). नेर ऊर्दू ही मुसलमानांची राष्ट्रभाषा आहे, इतकेच नव्हे तर, ती उभ्या हिंदुस्थानचीच राष्ट्रभाषा आहे या मुसलमानांच्या फ्रंचारांत शुद्ध झोडपणा कसा भरलेला आहे हे डॉ० आबेडकर यांनीच दर्शविले आहे (पृ० २६२). हिंदूंची एकजूट होत आहे व आपल्याला एकराष्ट्र म्हणून नांदले पाहिजे ही भावना हिंदु समाजांत वाढत आहे, हे डॉ०आंबेडकरांनाहि मान्य आहे (१०६). स्वतःच गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारें डॉ० आंबेडकर यांनी वस्तुतः असें म्हणावयाला पाहिजे होते की, हिंदुस्थानांत स्वतंत्र इस्लामी सष्ट्र असल्याची भाषा साफ खोटी व अनैतिहासिक आहे. हिंदूंचे स्वतंत्र राष्ट्र असल्याची कबुली त्यांना त्यांच्या पुराव्यावरून देतां आली नसती तरी,