पान:पाकिस्तानचे संकट.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विराष्ट्रवादाचे खंडन १३५ . शाहणा मसलमान त्या भाषेवर विश्वास ठेवणार नाहीं!डॉ०आंबेड:, करांनी या पुस्तकांत हिंदुसमाजाचे पुष्कळ दोष दाखविले आहेत .... व हिंदुसमाजाचे सध्यांचे नेतृत्व पांढरपेशा, सवर्ण हिंदूंच्या हाती असल्यामुळे हिंदुसमाजाचे नुकसान होत आहे असेंहि त्यांनी म्हटले .. आहे. हे सारे विवेचन वादग्रस्त असले तरी, एकंदर पुस्तकाची. - दृष्टि हिंदुसमाजाबद्दलच्या परकेपणाच्या भावनेनें दूषित झालेली. ,, ' नाहीं. डॉ. आंबेडकरांच्या मनांत हिंदुसमाजाबद्दलचा आपलेपणा वाढत आहे. उदारवृत्तीचा हिंदुसमाज हे ओळखील; व आपल्या माणसाने लाथ मारली तरी, विष्णूनें भृगूच्या लाथेचे श्रीवत्सचिन्ह भूषण म्हणून मिरविले त्याप्रमाणे ती सहन करावी असें मानील, असें गृहीत धरून चालावयाला हरकत नाही. हे पुस्तक वाचणारे शहाणे मुसलमान मनांत चरफडू लागावे, इतकी खरपूस टीका डॉ. आंबेडकर यांनी मसलमानांच्या मनोवृत्तीवर व समाजरचनेवर साधार केली आहे. असे असूनहि, काही संस्थानांतल्या मुसलमानांना डॉ० आंबेडकरांनी पाकिस्तान मान्य केलें, या खऱ्याखोट्या कल्पनेने आनंदाच्या उकळ्या फुटल्या ! प्रसृत झालेले हे वृत्त खरे असेल तर, या 'आनंद-कंदां'च्या बुद्धीची तारीफ करावी तितकी थोडीच ठरणार आहे ! पाकिस्तानचा पुरस्कार करण्याच्या हेतूने आपणं हे पुस्तक लिहीत नाहीं हे डॉ. आंबेडकरांनी (पृ०११ वर) स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. काही एका मर्यादित अर्थाने आंबेडकर यांनी 'पाकिस्तान' मान्य केले आहे. त्याचे कारण असें आहे की, हिंदुस्थानांत हिंदुराष्ट्र व मुसलमान राष्ट्र ही दोन भिन्न राष्ट्र आहेत असे त्यांनी गृहीत धरले आहे. हिंदुराष्ट्रपति बॅ० सावरकर यांच्या भाषणांतले अनेक उतारे उद्धृत करून (पृ० १२७-१३७) त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, मुसलमानांचें स्वतंत्र राष्ट्र हिंदुस्थानांत असल्याची कबुली बॅ० सावरकरांनी दिलेली आहे (पृ० १३८).. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू, पारशी अशा सर्वांचे मिळून हिंदी राष्ट्र व या सर्वांच्या ऐक्यावर हिंदुस्थानची राजकीय प्रगति अवलंबून या लल्या, पराधीन व प्रगतिबाधक विचारसरणीला उत्तर म्हणून बॅ० सावरकर