पान:पाकिस्तानचे संकट.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ पाकिस्तानचे संकट हे लोक सावध होतील असें सूचक विवेचन करावें व तें करतांना कोणत्याहि आग्रहाला बळी पडू नये, असे मला वाटले;) २९-१-१९३९ रोजी डॉ. आंबेडकर यांनी पुण्यास ‘फेडरेशन विरुद्ध स्वातंत्र्य' या विषयावर एक विचारप्रवर्तक व्याख्यान दिले. त्या व्याख्यानाची भूमिका स्पष्ट करून सांगतांना डॉ. आंबेडकर यांनी वरील शब्द वापरले होते. Thoughts on Pakistan, या पुस्तकाची भूमिकाहि जवळजवळ तशीच आहे. पाकिस्तान या महत्त्वाच्या विषयाचा विचार लोकांनी डोळसपणाने करावा या बुद्धीने डॉ. आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. रानडे-गोखले-टिळक यांच्या विचारनिष्ठ राजकारणाचे डॉ. आंबेडकर हे अभिमानी आहेत. अभ्यासूपणा व स्वतंत्र विचार ही जी या राजकारणाची लक्षणे ती लक्षणे डॉ० आंबेडकर यांच्या पुस्तकांत उत्कटपणे आढळतात; गेल्या सातआठ महिन्यांत 'पाकिस्तान' या विषयावर मराठीत जें लिखाण प्रसिद्ध झाले आहे त्याला आधारभूत असलेली माहिती डॉ. आंबेडकर यांच्या पुस्तकांतूनच प्रायः घेण्यात आलेली आहे. 'श्री० म० तु० कुलकर्णी यांच्या छोटेखानी पुस्तकांत ऊर्दू लेखांची काही भाषांतरे दिली आहेत; तेवढा ठळक अपवाद वगळला तर, याच खाणीतला मालमसाला उकरून व उपसून लेखांच्या बहुतेक इमारती रचण्यांत आलेल्या आहेत. या विषयापूरतेंच बोलावयाचे झाले तर डॉ० आंबेडकर यांच्या या पुस्तकाला 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ' हे वचन लावावयालाहि मी कचरणार नाही. एखाद्या विषयाला पैलू पाडून त्याचा अभ्यास कसा करावा हे तरुणांना शिकावयाचे असेल तर हा ग्रंथ त्यांना निश्चित मार्गदर्शक ठरेल... . हे पुस्तक वाचणाऱ्या हिंदूंना आणखीहि एका कारणामुळे आनंद वाटेल, असें मी समजतो. डॉ. आंबेडकर हे महाराष्ट्रातल्या महार समाजाला बरोबर घेऊन मुसलमान होणार असल्याचा बोभाटा मध्यंतरी बराच झाला होता. या बाबतींत डॉ. आंबेडकर नेमके काय म्हणाले होते व तें म्हणण्यांत त्यांचा हेतु काय होता हे येथे सांगण्याचे कारण नाही. हे पुस्तक वाचल्यावर इतकें मात्र स्पष्टपणे निष्पन्न होते की, डॉ. आंबेडकर आतां मुसलमान होण्याची गोष्ट बोलणार नाहीत आणि त्यांनी अशी भाषा अतःपर काढली तरी कोणताहि