पान:पाकिस्तानचे संकट.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामाजिक प्रकरण ८ वें मनाया आंबेडकर व पाकिस्तान मा द्विराष्ट्रवादाचे खंडन To my mind there is no doubt that this Gandhi age is the dark age of India. It is an age in which people, instead of looking for their ideals in the future, are returning to antiquity. It is an age in which people have ceased to think for themselves and as they have ceased to think, they have ceased to read and examine the facts of their lives......Such an age, I thought, needed something more than a mere descriptive sketch of the Federal Scheme. It needed a treatment which was complete though not exhaustive and pointed, without being dogmatic, in order to make it alive, to the dangers arising from the inauguration of the Federal Scheme.* ! (सध्यांचें गांधीयुग हे हिंदुस्थानांतलें अज्ञानयुग आहे याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. ध्येयसंशोधनार्थ भविष्यकाळाकडे वळावयाचें सोडून या युगांतले लोक भूतकाळाच्या भुयाराकडे परत चालले आहेत. या युगांतल्या लोकांनी स्वतंत्र विचार करण्याचे सोडून दिले आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, ग्रंथ वाचण्याचे व जीवनांतल्या घटनांचे परीक्षण करण्याचे कार्यहि त्यांनी सोडून दिले आहे. ... फेडरल घटनेच्या नुसत्या वर्णनात्मक रूपरेषेपलीकडे कशाची तरी गरज या युगांतल्या लोकांना आहे, असे मला दिसले. फेडरल घटनेचे सर्वांगपूर्ण नसले तरी संपूर्ण विवेचन या युगांतील लोकांच्या साठी करणे जरुरीचे आहे असे मला वाटले. फेडरल घटना प्रस्थापित झाली तर कोणती संकटें उद्भवतील याचे दिग्दर्शन होऊन,

  • Federation vs. Freedom, p. 154.