पान:पाकिस्तानचे संकट.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांनी मांडलेल्या पाकिस्तानच्या योजना १२९ विभागांत २,९०,६५,०९८ लोक नांदतील व त्यांत मुसलमानांचे शेकडा प्रमाण ७.४ असेल. (५) दिल्ली, मीरत विभाग, रोहिलखंड विभाग व अलीगड विभाग यांचा मिळून स्वतंत्र गट बनवावा. या गटांत १,२६,६०,००० लोक नांदतील व त्यांत मुसलमानांचे प्रमाण शेकडा २८ असेल ...(६) मलबार व दक्षिण कारवार अशा मुलखाचा मिळून मलबारप्रांत बनविण्यात यावा. यांत लोकसंख्या ४९,००,००० असेल व या लोकसंख्येत मुसलमानांचे शेकडा प्रमाण २७ राहील. पन्नास हजार लोकवस्तीहन जास्त लोकवस्तीच्या सर्व शहरांना 'स्वतंत्र शहरें' असा नवा दर्जा मिळावा व राज्यकारभाराच्या दृष्टीने ही शहरें स्वायत्त असावी अशी या प्रोफेसरद्वयाची मनीषा आहे. अशा सर्व शहरांत मिळून मुसलमानांची लोकवस्ती १३,८८,६९८ भरेल, असे या प्रोफेसरांनी हिशोबीपणाने सांगितले आहे. ज्या खेड्यांतून मुसलमानांची वस्ती सध्यां तुरळक आहे ती खेडी सोडुन, मुसलमानांची वस्ती बरीच असेल अशा खेड्यांत जाऊन मुसलमान खेडुतांनीं रहावें, अशी या दुकलीची सूचना आहे. नवा मुलुख घशांत पडल्यावर संघटित झालेल्या हैद्राबाद संस्थानला सार्वभौमत्वाच्या दृष्टीने नेपाळच्या बरोबरीचा तरी दर्जा मिळाला पाहिजे, अशी हि या दोन विद्वानांची महत्त्वाकांक्षा आहे! लतीफ-योजना डॉ० लतीफ यांनी मांडलेली योजना 'पंजाबी' यांच्या योजनेहून आणि अलीगडच्या प्राध्यापकांनी मांडलेल्या योजनेहून भिन्न आहे. त्यांनी सर्व हिंदस्थानचे चौदापंधरा गट (Zones) कल्पिले असून त्या गटांची विभागणी सांस्कृतिक दृष्ट्या केली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. सिंध, बलुचिस्तान, पंजाब, वायव्य सरहद्दप्रांत त्याचप्रमाणे खैरपूर आणि भावलपूर ही संस्थाने अशा सहांचा मिळून पहिला गट मानण्यांत आलेला आहे. या सर्वांचे मिळून फेडरेशनच्या पद्धतीने एक स्वायत्त राज्य निर्माण करणे हा हेत या योजनेंत आहे. पूर्वबंगाल व आसाम यांचा मिळून एक गट हिंदुस्थानच्या - ९पाकि०