पान:पाकिस्तानचे संकट.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० पाकिस्तानचे संकट.. . ईशान्य कोपऱ्यांत पाडण्यात आलेला आहे. पतियाळाच्या पूर्वहद्दीपासून लखनौपर्यंत आणि रामपूर संस्थानाला पोटांत घेऊन आग्रा, दिल्ली, कानपूर आणि लखनौ एवढ्या भूभागाचा मिळून तिसरा गट पाडण्यात आलेला आहे. हैद्राबाद संस्थान, व-हाड आणि कर्नळ, कडाप्पा, चितूर, उत्तर अकोट, चिंगलपट अशा रोखाने मद्रासपर्यंत जाऊन समुद्राला भिडणारा जमिनीचा पट्टा या सगळ्याचा मिळून चौथा गट बनविण्यांत आलेला असून, त्याला दक्षिण गट असें नांव देण्यांत आलेले आहे. हे चार मुसलमानी गट असून उरलेले हिंदुगट आहेत. या गटांपैकी पहिल्या गटांत बंगालचा उरलेला भाग आणि बंगालशी ज्याचे साधर्म्य आहे असा बिहारचा भाग यांचा समावेश केलेला आहे. ओरिसा प्रांताचा स्वतंत्र गट पाडण्यांत आलेला आहे. बिहार, संयुक्तप्रांताचा उरलेला भाग आणि मध्यभारतातील संस्थाने यांचा मिळून तिसरा गट पाडण्यात आलेला आहे. रजपुतान्यांतील संस्थाने, काठेवाडसह गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळ भाषाप्रधान मुलुख, मलबार आणि वायव्य सरहद्दीलगतचा हिदु-शीख वस्तीचा भाग असे स्वतंत्र गट मानण्यांत आलेले आहेत. शेवटच्या गटांत काश्मीर संस्थानांतील काही भागाचा अंतर्भाव करण्यांत आलेला आहे.

ज्या गटांत हिंदुवस्ती प्रधान आहे त्या गटांतील मुसलमानांनी स्थानांतर करावें व लगतच्या मुस्लीम गटांत सामील व्हावे आणि मुस्लीम गटांत असणाऱ्या हिंदुशीखांनींहि याच मार्गाचा अवलंब

करावा असें डॉ० लतीफ यांनी सुचविले आहे. हरिजनांनी हिंदुगटांत राहावयाचें की मस्लीम गटांत जावयाचे हे ठरविण्याची मुंभा हरिजनांना देण्यात आलेली आहे.. शिकंदर हयातग्गन यांची योजना शिकंदर हयातखान यांनी मांडलेली योजना हिंदुस्थानच्या विभक्तीकरणाची योजना नाहीं असें सकृद्दर्शनी भासतें. १९३५ च्या घटना कायद्याची दुरुस्ती कशी करावी हे सुचविण्याच्या हेतूनें सदर योजना तयार करण्यांत आलेली आहे. या योजनेंत संस्थानी हिंदुस्थान व ब्रिटिश हिंदुस्थानः या 'सगळयाचे मिळून सात विभाग पाडण्यात आलेले आहेत. पश्चिमेकडील