पान:पाकिस्तानचे संकट.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ पाकिस्तानचे संकट नाहीत! ते पडले 'राष्ट्रीय'! पण, जे लोक हिंदु म्हणून विचारच करीत नाहीत-इतकेच नव्हे तर हिंदु म्हणून विचार करणे निषिद्ध मानतातत्यांना अहिंदूंना हिंदूंच्यातर्फे हमी देण्याचा अधिकार तरी कसा प्राप्त होतो? अलीगड-योजना अलीगडचे दोन प्रोफेसर सय्यद झाफरुल हसन व महंमद अब्दुल हुसेन काद्री यांनी आपल्या संयुक्त बुद्धिबलानें पाकिस्तानची एक योजना घडविली आहे. तिची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे : (१) पंजाब, सिध, वायव्य सरहद्दप्रांत, बलुचिस्तान हा ब्रिटिशहहींतला भाग आणि काश्मीर (जम्मूसह), मंडी, चंबा, सकीत, सुमीन, कपूर्थळा, मालेरकोटला, चित्रळ, दीर, कलात, लोहारू, बिलासपूर, सिमला हिलस्टेट्स्, भावलपूर हा संस्थानी विभाग या सगळ्यांचा अंतर्भाव पाकिस्तानमध्ये व्हावा. या पाकिस्तानची लोकसंख्या ३,९२,७४,२४४ भरेल: व त्यांत राहणाऱ्या २,३६,९७,५३८ मुसलमानांचे एकंदर लोकवस्तीत प्रमाण शेकडा ६०.३ राहील... (२) हावरा व मिदनापूर हे दोन जिल्हे वगळून उरलेला सर्व बंगाल, बिहारमधील पूर्णिया जिल्हा व आसाममधील सिल्हेट जिल्हा यांचा मिळून बंगाली विभाग पाडण्यात यावा. या विभागांत ५,२५,७९.२३२ लोक नांदतील व त्यांत मुसलमानांचे शेकडा प्रमाण ५७ भरेल. (३) हैद्राबाद संस्थान विभागांत समाविष्ट होणारा भाग, पाकिस्तान आणि बंगाललगतच्या संस्थानांसुद्धां बंगालविभाग एवढा भाग वगळून उरलेल्या सध्यांच्या हिंदुस्थानला 'हिंदुस्थान' हे नांव द्यावें. या हिंदुस्थानची लोकसंख्या २१ कोटी ६० लक्ष भरेल व त्यांत मुसलमानांचे शेकडा प्रमाण ९७ राहील. (४) सध्यां मद्रास इलाख्यांत असलेला व ओरिसा प्रांतांत गेलेला कर्नाटक विभाग धरून सगळा कर्नाटक प्रांत व व-हाड हे निजामला फिरून देण्यात यावे व सध्याचें हैद्राबाद संस्थान, नवसंयुक्त कर्नाटक व व-हाड अशा सर्व सघटित भूभागाला 'हैद्राबाद' अशी संज्ञा देण्यात यावी. या