पान:पाकिस्तानचे संकट.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट अधिकृत रीतीने उच्चार केला. त्यापूर्वी अनेक वर्षे तो शब्द उच्चारिला व प्रचारिला जात होता. डॉ० राजेन्द्र प्रसाद यांनी 'पाकिस्तान' या आपल्या छोट्या पुस्तकांत पाकिस्तानच्या . म्हणजे भरतखंडाच्या विच्छेदाच्याचार भिन्न भिन्न योजनांचा निर्देश केला आहे व त्या योजनांचा त्यांनी तांत्रिक परामर्शहि घेतला आहे. भिन्न भिन्न तपशिलाच्या व भिन्न भिन्न व्यक्तींकडून मांडल्या गेलेल्या या योजना कित्येक वर्षांच्या विचाराविना व प्रचाराविना प्रसिद्ध झाल्या नाहीत, हे उघडच आहे. १९३० सालच्या लखनौच्या मुस्लीमलीग अधिवेशनाचे अध्यक्ष सर महंमद इक्बल यांनी या कल्पनेचा उच्चार केला होता. गोलमेज परिषदेच्या वेळी मि० रहमतअल्ली नांवाच्या एका मुसलमान गृहस्थाने भारत विच्छेदनाची एक योजना प्रतिनिधींमध्ये, प्रसृत केली होती; पण, ती अधिकृतरीत्या पुढे मात्र मांडली गेली नाही. या योजनेवर ब्रिटिश सरकारच्या मान्यतेचा शिक्का मारून घेण्याचा प्रयत्ल झाला; पण, मुसलमानांची ही योजना म्हणजे पूर्वीच्या मुस्लीम साम्राज्याच्या पुनरुज्जीवनाचाच प्रयत्न होय असें ब्रिटिश मुत्सद्यांना वाटल्यामुळे, त्यांनी सदर योजनेचा विचार करण्याला नकार दिला, अशा आशयाची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या Thoughts on Pakistan या पुस्तकाच्या पृ. १७-१८ वर Inside India या ग्रंथाच्या आधारें दिली आहे. याचाच अर्थ असा की, भारताचे अखंडत्व धुळीला मिळवून देण्याची व भारतांत मुसलमानांचा स्वतंत्र सुभा उभा करण्याची कारस्थाने धूर्त मुसलमान पुढारी आज कित्येक वर्षे करीत आले आहेत. 'थोडे दिन मे गांधीराज' वगैरे वायफळ घोषणांचे सावणी फुगे हवेत उडविणाऱ्या व त्या फुग्यांत दिसणाऱ्या रं चमत्कृतीवर स्वतः खूष होऊन दुसऱ्यांना झुलविणाऱ्या लोकांनी या कारस्थानांकडे कानाडोळा केला, इतकेंच ! का पाकिस्तान हा शब्दच तीस कोटी हिंदूंचा उपमर्द करणारा आहे. लोकसंख्येमुळे वा राजसत्तेमुळे भारताचा जो जो विभाग मुसलमानी वर्चस्वाखालीं नांदत आहे अगर नांदण्याजोगा आहे तो तो विभाग पाक म्हणजे पवित्र लोकांचा देश असून, भरतखंडाचा उरलेला तुकडा अपवित्र हिंदूंसाठी सोडून दिलेला आहे, अशी कुत्सा या शब्दांत भरलेली आहे.