पान:पाकिस्तानचे संकट.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. । मुसलमानांनी मांडलेल्या पाकिस्तानच्या योजना १२७ हा एक देश आहे व त्याचे एकत्व श्रीरामचंद्रापासून आजपर्यंत राजकीय दृष्टयाहि मान्य व सिद्ध झालेले आहे असे सांगून, राजेंद्रबाबूंनी द्विराष्ट्रवाद साफ खोटा असल्याचे स्पष्ट शब्दांत बजावले आहे. ज्या भानगडी. मिटाव्या म्हणून पंजाबींनी एवढा खटाटोप केला त्या भानगडी शेवटी शिल्लकच राहतात हे त्यांनी 'सिधुस्तान संघराज्या'चे उदाहरण घेऊन स्पष्ट केले आहे. या संघराज्यांतहि 'अल्पसंख्य विरुद्ध बहुसंख्य' हे भांडण शिल्लक राहतेंच आणि एवढ्याशा या भागांतहि भाषाभेदांचा बुजबुजाट टिकून राहतोच. मग, सिंधुस्तानच्या मर्यादेत जो प्रकार चालू देण्याला पंजाबी तयार आहेत तोच प्रकार आजच्या हिंदुस्थानांत चालू देण्याला मात्र पंजाबींचा इतका विरोध कां असावा, असा सवाल राजेंद्रबाबूंनीं पंजाबींना विचारला आहे. इतक्या सर्व गोष्टी नीटपणी मांडल्यावर, राजेंद्रबाबूंनी एक गोष्ट केली आहे ती मात्र सर्वस्वी अनवश्यक आहे. मुसलमानांना एका बाबतींत निर्विवाद अधिकार आहे हे सांगण्याला आपण विलंब केला याबद्दल हळहळ वाटून राजेंद्रबाबू लिहितात : The Muslims have every right to insist that they shall not be interfered with in the observance of their religious rites and worship. * (धार्मिक विधि व पूजाअर्चा या बाबतीत इतरांनी आम्हांला अडथळा करता कामा नये असें हक्काने आग्रहपूर्वक म्हणण्याचा मुसलमानांना अधिकार आहे ! ) - हिदंनी या बाबतींत मुसलमानांना कधी अडथळा केला नाहीं हे सत्य दृष्टिआड करून, अशा मागणीबाबतचा मुसलमानांचा . ,, अधिकार मान्य करणे म्हणजेच हिंदूंची नालस्ती करणे होय ! मुसलमानांचे सगळे रास्त अधिकार हिंदूंनी आजवर वाजवीहून अधिकच मानले आहेत. हिंदूंचे अधिकार मात्र इतरांकडून संधि साधेल तेव्हां पायातळी तुडविले गेले आहेत ! यामुळे, मुसलमानांना हमी देण्याऐवजी हिंदूंनी त्यांच्याकडूनच हमी मागितली पाहिजे ! पण, डॉ. राजेंद्रबाबूंना हे विचार सूचावे कसे? ते कांहीं 'हिंदु' म्हणून कोणत्याहि गोष्टीचा विचार करीत *Pakistan, p. 29. . .................