पान:पाकिस्तानचे संकट.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ पाकिस्तानचे संकट ..... U हिंदूंचे व मुसलमानांचे प्रमाण अनुक्रमें शेकडा ८३.७२ व ११ असें असेल. असा हिशोब मांडण्यात आलेला आहे. 'राजस्थानी संघराज्य' या तिसऱ्या संघराज्यांत ब्रिटिश हद्दीतला मुलुख मुळीच नसून, राजस्थानमधील सर्व संस्थाने व मध्यभारतांतील संस्थाने यांचा अंतर्भाव या संघराज्यांत होणार आहे. या संघराज्याचे क्षेत्रफळ १,८०,६५६ चौरस मैल भरेल व त्यांत १,७८,५८,५०२ लोक नांदतील, असा अंदाज आहे. यांत हिंदु व मुसलमान यांचे शेकडा प्रमाण अनुक्रमें ८६.३९ व ८.०९ असें राहील. - 'दक्षिणी संस्थान संघराज्य' या संघराज्यांत हैद्राबाद, म्हैसूर, व बस्तर -संस्थाने यांचा अंतर्भाव होणार आहे. याचे क्षेत्रफळ १,२५,०८६ चौरस मैल भरेल व त्यांत २,१५,१८,१७१ लोक नांदतील असा अंदाज बांधण्यांत आलेला आहे. हिंदु व मुसलमान यांचे या लोकवस्तीतले प्रमाण अनुक्रमें शेकडा ८५.२६ व ८.९९ भरेल. . . ' 'बंगालो संघराज्य' या पांचव्या संघराज्यांत पूर्वबंगालमधील बहुतेक सगळा भाग, आसामचे गोलपारा व सिल्हेट हे :ोन जिल्हे आणि त्रिपुरा, कुचबिहार वगैरे संस्थाने यांचा समावेश व्हावयाचा आहे. या संघराज्याचे क्षेत्रफळ ५९,७६४ चौरस मैल भरेल असा अंदाज आहे. त्यांत नांदणाऱ्या ३ कोटी १० लक्ष लोकसंख्येत मुसलमानांचे शेकडा प्रमाण ६६:१ राहील व हिंदूंचे शेकडा प्रमाण ३३.९ राहील, असाहि तर्क करण्यांत आलेला आहे.. - ही जी पांच संघराज्ये होणार त्या प्रत्येकावर एक गव्हनर जनरल सत्ता चालविणार व या संघराज्यांत समाविष्ट होणाऱ्या प्रांतिक घटकांवर प्रत्येकी एक या प्रमाणांत गव्हर्नरांची सत्ता चालणार ! या पांच संघराज्यांचे मिळन जे सरसंघराज्य बनणार त्याचा अधिकारी 'व्हाइसरॉय' या नावाने ओळखला जाणार! या संघराज्यांच्या व सरसंघराज्यांच्या कारभाराविषयी पंजाबींनी जो तपशील मांडला आहे त्याच्याशी 'पाकिस्तान' अमान्य करणाऱ्या लोकांना तूर्त तरी कांहीं कर्तव्य नाहीं ! पंजाबींच्या या संघराज्य-योजनेवर व सर-संघराज्यकल्पनेवर डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या शांतदांत काँग्रेसजनाने जे आक्षेप घेतले आहेत त्यांची नोंद करून ठेवणे अवश्य आहे. भौतिक, भौगोलिक वगैरे सर्व दृष्टींनी हिंदुस्थान