पान:पाकिस्तानचे संकट.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट प्रकरण १ लें पाकिस्तान : शब्द व कल्पना पाकिस्तान (पाक + इ + स्तान) हा शब्द गेल्या दोनतीन वर्षांत सर्वांच्या परिचयाचा झालेला आहे. मुस्लीमलीगचे बॅ० जीनाप्रभृति पुढारी या शब्दाचा उच्चार उघडउघड करूं लागल्यामुळे व पाकिस्तानची मागणी मान्य झाल्याविना भारतीय मुसलमान स्वस्थ राहाणार नाहीत असें बजावून सांगण्याला त्यांनी प्रारंभ केल्यामुळे या शब्दाला भरपूर प्रसिद्धि मिळाली व त्याची प्रतिष्ठाहि मनस्वी वाढली. मुसलमानांच्या मनांत पाकिस्तानची शेखमहंमदी सुखस्वप्ने खेळत व घोळत आहेत हे ज्यांना आज बरीच वर्षे अवगत होतें त्यांनी लोकमत जागृत करण्याचे कितीहि प्रयत्न केले असले तरी, या शब्दाच्या प्रचाराचे कार्य अत्यल्प प्रमाणांतच झाले होते. कारण, सार्वजनिक संकट आगाऊ ओळखण्याची व त्याचा प्रतिकार करण्याला वेळीच सिद्ध होण्याची संवय सुटल्यामुळे, दूरस्थ संकटाचा इषारा देणारा जागृत इसम हिंदुसमाजाला उपद्व्यापी व तापदायक वाटतो. मुस्लीमलीग व बॅ० जीना यांनी या शब्दाचा उच्चै?ष सुरू केल्यामुळे व त्या घोषामुळे ब्रिटिश मुत्सद्दी, काँग्रेसधुरीण वगैरे 'मी' 'मी' म्हणणारे लोक प्रायः दिङमूढ झाल्यामुळे मात्र, पाकिस्तान हा एक भला मोठा बागुलबोवा आहे, त्यामुळे भारतीय राष्ट्राला व राष्ट्रीयत्वाला मोठा धोका उत्पन्न होणार आहे इत्यादि कल्पना मोघमपणाने पुष्कळांच्या मनांत उद्भवू लागल्या आहेत. या कल्पना स्पष्ट स्वरूपांत सर्वांच्या मनांत बिंबणे व या घातकी कल्पनांच्या प्रतिकारासाठी सर्वांनी सिद्ध होणे हे प्रस्तुतच्या परिस्थितीत भारतातील सर्वांचें-निदान भारतातील कोट्यवधि हिंदूंचे–पहिले व पवित्र कर्तव्य होय. पाकिस्तान हा शब्द वाटतो तितका नवा नाही. १९४० च्या मार्च महिन्यांत बॅ०जीनांनी व मुस्लीमलीगनें लाहोर येथील लीगच्या अधिवेशनांत या शब्दाचा -