पान:पाकिस्तानचे संकट.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतांची अडाणी मांडणी विभागाच्या सगळ्या जमिनीमध्ये या जिल्हयांची जमीन सर्वश्रेष्ठ आहे. हे जिल्हे सोडून उरलेल्या मुसलमानी भागाचे संघराज्य बनविलें तर त्या संघराज्यांत शिल्लक काय उरेल ? भावलपूर व खैरपूर संस्थानांचे वालुकामय प्रदेश, रावळपिंडी विभागांतील वैराण व खडकाळ जमीन, मुलतानं विभागांतील वाळचे पट्टे, आणि पाणथळ बनल्यामुळे टाकाऊ ठरलेले वसाहतीचे विभाग, सरहद्द प्रांताची कनिष्ठ जमीन आणि बलुचिस्तान आणि सिंध यांमधील रेताड उंचवटे!) शीख वस्तीचे हे मध्यवर्ति जिल्हे म्हणजे पंजाब प्रांतांतला लोण्याचा गोळा आहे. तो सोडुन बाकीच्या भागांतलें ताकवणी 'पंजाबी 'ना नको आहे. शिखांचें कृपाण आपल्या छातीवर सतत लटकत राहाणार हे 'पंजाबी 'ना पक्कें माहीत आहे. ते टाळणे : शक्य असते तर त्यांनी ते टाळलेहि असते. कारण ते लिहितात : The geographical situation of the Shikh areas in the Punjab is such that they cannot be easily excluded from it as could have been possible if they had been all located to one side of Industan, like the Ambala division or the Kangra district.* (पंजाबांत शिखांचे भौगोलिक स्थान असें आहे की, त्या स्थानामुळे त्यांना सहज बाहेर काढतां येत नाही. अंबाला विभाग, कांग्रा जिल्हा यांच्याप्रमाणे सिंधुस्तानच्या एका टोकाला त्यांचे स्थान असते तर त्यांना बाहेर काढणे शक्य झाले असते.) पर ते शक्य नसल्यामुळे सामदामाची भाषा बोलन शिखांना आपल्या पाकि. स्तानात समाविष्ट करण्याचा प्रयत्न 'पंजाबी'नी केला आहे. मोठ्या औदार्याने 'पंजाबी' लिहितात :: The Shikhs can hope to get at least one minister in Federal Government of Sindistan while they can never *Confederacy of India, p. 183. 5 m