पान:पाकिस्तानचे संकट.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट डॉ. आंबेडकर यांच्या मनांतून कांग्रा, अंबाला, कर्नाळ, रोहटक, गुरगांव, हिसार, फिरोजपूर, लुधियाना, जालंदर, अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर व सिमला हे सध्यांच्या पंजाबमधले जिल्हे तोडून ते हिंदुस्थानांत राखून ठेवावयाचे आहेत; कारण, या सर्व जिल्ह्यांतून हिंदु व शीख हे लोकसंख्येनें मुसलमानांच्यापेक्षा अधिक आहेत. Confederacy of India या पुस्तकाचे कर्ते 'ए पंजाबी' हे इतका मुलुख सोडावयाला तयार नाहींत.. अंबाला, कांग्रा व होशियारपूर एवढे तीनच जिल्हे सोडण्याची त्यांची तयारी आहे. अंबाला जिल्हा दुष्काळपीडित असल्याबद्दलची त्यांचीच कबुली वर उद्धृत करण्यांत आलेली आहे. लुधियाना, जालंदर, फिरोजपूर वगैरे जिल्हे सध्यांच्या पंजाब प्रांताच्या मध्यभागी आहेत; व या भागांत शीख हे संख्याधिक्यामुळे श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जिल्हयांत हिंदु व शीख यांच्या तुलनेने मुसलमान हे कमी असल्यामुळे 'ए पंजाबी' यांनी हे जिल्हे सोडून देण्यास वस्तुतः तयार झाले पाहिजे; पण, तसे करण्याला ते मुळीच तयार नाहीत. याचे कारण सांगतांना पंजाबी लिहितात : The Muslims can never agree to any proposal regarding the exclusion of the central districts from the Punjab, firstly because, most of the Muslim intelligentsia is. concentrated in them, secondly because the soil of these districts is the best in the whole of the Indus region and after their exclusion, a federation of the remaining Muslim tracts will be a federation of the sandy tracts of Bahawalpur and Khairpur States, barren and rocky soil of the Rawalpindi division, sardy stretches and colony areas of the Multan division which are already becoming waterlogged and being deserted, bad soil of North West Frontier Province and the sand dunes of Baluchistan and Sind.* (पंजाबचे मध्यवर्ति जिल्हे वगळण्याच्या कोणत्याहि योजनेला मुसलमान केव्हांहि मान्यता देणार नाहीत. याचे पहिले कारण असे की, बुद्धिवान मुसलमान वर्ग या भागांत एकवटलेला आहे. दुसरे कारण असे की, सरहद्द

  • Confederacy of India, p. 184.