पान:पाकिस्तानचे संकट.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट dream of having a Shikh minister in the Cabinet of the Federal Government of India.* (वायव्य कोपऱ्यांतील विभागाच्या संघराज्यांत शिखांना एकादी तरी दिवाणगिरी मिळण्याची आशा करता येईल. पण, उभ्या हिदुस्थानच्या संघराज्याच्या मंत्रिमंडळांत एकादें मंत्रिपद मिळेल ही कल्पना शिखांनी स्वप्नांतहि आणू नये.) शिखांची लष्करी परंपरा हिंदूंना अवगत असल्यामुळे, भारताच्या संघराज्यांत एकाद्या लायक शिखाला केवळ साधा मंत्री नव्हे, तर लष्करी खात्याचा मंत्री होतां येईल हे 'पंजाबीं'च्या लक्षात आलेले दिसत नाही. गेल्या सालीं व्हाइसरॉयचे कार्यकारी मंडळ विस्तृत होण्याची भाषा सुरू झाली आणि हिंदुमहासभेने हिंदूंसाठी सहा जागांची मागणी केली. त्या वेळी, या सहा जागांपैकी एक जागा शिखांसाठी व एक जागा पूर्वास्पष्टांसाठी मागण्यांत येत आहे असा खुलासा करण्यांत आला होता हे 'पंजाबी'च्या खोडसाळ मुद्याला पुरेसे उत्तर आहे. असल्या विषगर्भ मधाच्या बोटावर शीख लुब्ध होतील असे समजणाऱ्या 'पंजाबी'नी एक गोष्ट ध्यानांत धरावी! आपल्यावरून जग ओळखणे हे बरे असले तरी, ते नेहमीच बरोबर मात्र नसते! ११. वायव्य सरहद्दप्रांतीयोगा। हा प्रांत इंग्रजांनी १८४९ मध्ये काबीज केला व कारभाराच्या सोईसाठी पंजाबला जोडला. परक्या शत्रूच्या स्वायऱ्यांचा पूर्वापार चालत आलेला मार्ग म्हणून हा प्रांत प्रसिद्ध आहे व त्यामुळेच त्याला महत्त्वहि आहे. या प्रांताच्या आसपास डोंगराळ मुलखांत राहणाऱ्या टोळ्यांना फार जपावें लागते. या जमातींच्या मनोरचनेचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यांत आलेले आहे : Environment has developed in them a freedom born of their wind-swept mountain sides, a hatred of control and a patriotic spirit amounting to a religion. j h alhot *Confederacy of India, p. 186.hot

  • The Challenge of the North-West Frontier by C. F. And ress.