पान:पाकिस्तानचे संकट.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ प्रांतांची अडाणी मांडणी भागाचा एक गट म्हणून निर्देश केलेला आहे.* प्रसंग पाहून व-हाड परत मिळण्याबद्दलची मागणी निजामाकडून केली जाईल, यांत संशय नाहीं. ब्रिटिश सरकार ती मान्य करील की काय हे परिस्थितीवर अवलंबून राहील. स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाचा सोईस्करपणानें उपयोग करून हवे ते प्रांत वेगळे तोडून देणारे ब्रिटिश सरकार अशा प्रसंगी व-हाडच्या हिंदुप्रजेचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करील की नाही, हा प्रश्न तर्कशास्त्राने सुटणारा नसून तो राजनीतिशास्त्राने सुटणारा आहे. व-हाडला वेढणाऱ्या निजामी हद्दीतील मुसलमानांची व-हाडांतली आवक गेली ८-१० वर्षे वाढत असून, त्यांच्या बोलीचा परिणाम व-हाडांतील मराठी भाषेवर यापूर्वीच होऊ लागलेला आहे ! १८३४ साली बंगालमधून निराळा काढलेला आग्रा प्रांत व अयोध्या प्रांत या दोघांचा मिळून संयुक्तप्रांत बनविण्यांत आला व १९०२ साली या प्रांतावर लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणक करण्यांत आली. १९२१ सालीं. लेफ्टनंट गव्हर्नरच्या जागी गव्हर्नर आला. प्रांताचे एकंदर ४८ जिल्हे आहेत. त्यांतले ३६ आग्रा विभागांत असून १२ अयोध्या विभागांत आहेत. प्रांताचें क्षेत्रफळ १,०६,२४८ चौरस मैल आहे. त्यांत आग्रा प्रांताचंच ८२,१३७ चौरस मैल आहे. १९३१ च्या शिरगणतीप्रमाणे आग्रा प्रांताची लोकसंख्या ३,५६,१३,७८४ असून अयोध्या प्रांताची १,२७,९४,९७९ आहे. आग्रा प्रांतांतल्या मुसलमानांची संख्या ५३,१८,०७७ असून त्यांचे प्रमाण शेंकडा १४:१ आहे . अयोध्या प्रांतांत मुसलमानांची लोकसंख्या १८,६३,८५०. आहे व त्यांचे शेकडा प्रमाण ८ आहे. काशी, प्रयाग, हरद्वार, मथुरा इत्यादि हिंदूंचीं क्षेत्रे याच प्रांतांत आहेत. एक लक्षाहून जास्त वस्तीची सात शहरें या प्रांतांत आहेत. या प्रांतांत चार विद्यापीठे आहेत.. सगळ्या प्रांतांत मुसलमान अवघे शेकडा १४ आहेत हे खरे; पण शहरी वस्तीत मुसलमानांचे प्रमाण जवळजवळ शेकडा ४० आहे. जुन्या परंपरेमुळे मुसलमानांना प्राप्त होणारें वजन, जमीनदारवर्गांतले त्यांचे स्थान, अलीगडच्या मुसलमानी केन्द्राचें । *Pakistan by Dr. Rajendra Prasad, p. 36. ..